ही कोणती संस्कृती? वडील, विठ्ठल म्हणायचे आणि वयाच्या 83 व्या वर्षी घरातून बाहेर काढायचे?

ही कोणती संस्कृती? वडील, विठ्ठल म्हणायचे आणि वयाच्या 83 व्या वर्षी घरातून बाहेर काढायचे?

Supriya Sule on Ajit Pawar : अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ऐवजी स्व. यशवंतराव चव्हाण यांचा फोटो बॅनरवर लावण्यात आला आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की देर आये दुरुस्त आये. शरद पवार यांनी जे काय राजकारण केलं ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने केलं. नाशिक मध्ये बॅनर कोणी लावले मला माहित नाही. त्यांना उशीरा का होईना चव्हाण साहेबांची आठवण झाली. याचे मी मनापासून स्वागत करते.

सोमवारी राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत दुसरी सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाकडून आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहेत असा दावा केला जातोय. आम्हाला चिन्ह आणि पक्ष देखील आम्हाला मिळलं असा दावा देखील केला जातोय. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की माझा इलेक्शन कमिशनवर पुर्ण विश्वास आहे.

चुकीबद्दल एक भाऊ म्हणून मी माफी मागतो; सुप्रिया सुळेंनी फटकारताच मिटकरींचा माफीनामा

मला एकच चिंता वाटते, समोरील गटातील नेते सातत्याने सांगतात पक्ष आणि चिन्ह त्यांच आहे. यामध्ये तीनच गोष्टी वाटतात. पहिली म्हणजे पेपर हा परिक्षेच्या आधीच फुटलेला आहे. दुसरा गोष्ट म्हणजे दिल्लीची कोणती तरी अदृश्य शक्ती त्यांना सांगत आहे. कुछ तो गोलमाल है,असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजितदादा गटाच्या बॅनरवर शरद पवारांऐवजी ‘या’ नेत्याचा फोटो; मंत्री धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की सातत्याने त्या गटातील अनेक नेते म्हणते होते की शरद पवार हे आमच्यासाठी देवासारखे आहेत, आमचे विठ्ठल आहेत असं बोलत होते. पण ही पहिलीचं लोक असतील महाराष्ट्रातील आणि भारताच्या संस्कृतीतील की ज्याला वडील म्हणायचे, विठ्ठल म्हणायचे त्याला आपल्या ह्क्काच्या घरातून वयाच्या 83 व्या वर्षी बाहेर काढण्याचे, ही कोणती संस्कृती आहे? पण हे महाराष्ट्रात आणि देशात पहिल्यांदाच होताना दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube