Download App

मनसे लढवणार विधानसभा निवडणूक, महायुतीकडे करणार ‘इतक्या’ जागांची मागणी

Vidhansabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना देशाचे पंतप्रधान

  • Written By: Last Updated:

Vidhansabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता मनसेने मोठा निर्णय घेत आगामी विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) तयारी सुरु केली आहे.

राज्यात ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, मनसे देखील विधानसभा निवडणूक लढवणार आहे. यासंर्भात 13 जून रोजी मनसेची महत्वाची बैठक पार पडणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मनसेकडून महायुतीकडे मुंबई आणि परिसरातील 20 जागांची मागणी करण्यात येणार आहे. यासाठीच उद्या 13 जून रोजी महत्वाची बैठक होणार आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत मनसेकडून मोठ्या संख्येने उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार यावेळी मनसे महायुतीकडे दादर, वरळी, लालबाग, वर्सोवा, दिंडोशी, जोगेश्वरी, घाटकोपर पश्चिम, कल्याण, ठाणे, चेंबूर, भिवंडी, नाशिक, पुणे या सारख्या जागांची मागणी करू शकते.  तर 4 दिवसापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांसोबत बैठक केली असून या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या उमेदवारांबाबत चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

तर दुसरीकडे राज्यात सुरू असणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तर याच मतदारसंघातून भाजपकडून निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी घेतली अजित पवारांची भेट… राजकीय चर्चांना उधाण

मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या विनंतीनंतर राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेचा उमेदवार मागे घेतल्याची घोषणा मनसेकडून करण्यात आली होती. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे किती जागांवर उमेदवार जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सरपंच ते मुख्यमंत्री, जाणून घ्या ओडिशाचे नवीन मुख्यमंत्री मोहन माझी यांचा राजकीय प्रवास

follow us

वेब स्टोरीज