Download App

छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी कोणी केली? खासदार कोल्हेंनी थेट पुरावेच आणले

  • Written By: Last Updated:

Amol Kolhe On Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) बदनामी कोणी केली? यावर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी वक्तव्य केलंय. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महारांजाविषयी चुकीची माहिती प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. विकीपीडियाच्या मागे नेमकं काय शिजतंय? यावर अमोल कोल्हे यांनी केलाय.

एकीकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील छावा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. तर दुसरीकडे संभाजी महारांविरोधात विकीपीडियावर चुकीची माहिती प्रदर्शित केली जातेय. हे षडयंत्र आहे का? जर षडयंत्र असेल तर याची मुळे कुठे जातात? आधीसुद्धा हे प्रयत्न अशाच पद्धतीने करण्यात आले होते, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. उजव्या विचार सरणीच्या लोकांना चेव चढलाय, असं ते म्हणाले आहेत.

VIDEO : हातात हात पकडून दीपप्रज्वलन, मग थेट मोदींनींच भरला पवारांसाठी पाण्याचा ग्लास; दिल्लीत नेमकं काय घडलं?

हे एक जाणुनबुजून रचलेलं कारस्थान आहे. छावा चित्रपट जगभर पसरत आहे. अनेकांना संभाजी महाराज माहित नाहीत. त्यामुळे ते महाराजांची माहिती शोधण्यासाठी विकीपीडीयावर जातील. त्यांना चुकीची माहिती मिळेल, असा कट असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. या षडयंत्रामागे कोण आहेत? अनेक व्लॉग्स, वेबसाईटने दिलेली आहे. अनेकदा छत्रपती संभाजी महाराजांविषयी निगेटिव्ह लिहिलं गेलंय. पण त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलंय, असा नरेटिव्ह सेट केला गेलाय.

त्यांच्या संघर्षाचा इतिहास झाकाळला जावून केवळ बलिदानाचा इतिहास वर आणला जातोय. या पापाचे वाटेकरी कोण? यावर बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदुपदपादशाही आणि स्वातंत्र्याच्या पाऊलखुणा या दोन ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी बदनामीकारक मजकूर लिहिलाय. सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांनी त्यांच्या बन्च ऑफ थॉट्स या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल बदनामीकारक लिखाण केलंय. राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास नाटकात यथेच्छ बदनामीकारक भूमिका लिहिल्या आहेत. बाळाजी अवजीने 1811 मध्ये चिटणीसांच्या बखरीत देखील असंच लिहिलंय.

VIDEO : ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके, मराठी अमृताहून गोड’…दिल्लीत PM मोदींचं मराठीत भाषण

पणजोबाला हत्येच्या पायी दिलं होतं, याचा बदला म्हणून हा राग आणि रोष चिटणीसांच्या बखरीत उतरला. तिथून त्यांची बदनामी करायला सुरूवात झाली, त्यामुळं या सगळ्या वेगवेगळ्या लेखकांच्या प्रवासाचा छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करण्याच्या पापात वाटा आहे, असं खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलंय. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या पुस्तकात देखील हा उल्लेख आहे, असं म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी पुरावे दाखवले आहेत.

 

follow us