VIDEO : हातात हात पकडून दीपप्रज्वलन, मग थेट मोदींनींच भरला पवारांसाठी पाण्याचा ग्लास; दिल्लीत नेमकं काय घडलं?

VIDEO : हातात हात पकडून दीपप्रज्वलन, मग थेट मोदींनींच भरला पवारांसाठी पाण्याचा ग्लास; दिल्लीत नेमकं काय घडलं?

PM Modi And Sharad Pawar At Akhil Bharatiya Marathi Sammelan : दिल्लीमध्ये 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sammelan) पार पडतंय. यावेळी पंतप्रधान मोदींसह (PM Modi) महाराष्ट्रातील देखील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान मोदींनी दीपप्रज्वलन केलं. यावेळी पवार अन् मोदींनी एकमेकांचा हात धरलेला दिसला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यासाठी स्वत: पाण्याचा ग्लास भरल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याचं पाहायलं मिळालं.

VIDEO : ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके, मराठी अमृताहून गोड’…दिल्लीत PM मोदींचं मराठीत भाषण

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मराठी साहित्याचा अमृत अनुभव घेण्यासाठी आपण पुन्हा जमलो आहोत, याचा मला अभिमान आहे. देशाच्या राजधानीत हे संमेलन दुसऱ्यांदा होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी हजर राहिलेत याचाही मला मनापासून आनंद होतोय, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केलंय. ते म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान मोदींनी प्रयत्न केले होते. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तब्बल 70 वर्षांनी मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतंय. मोदींना निमंत्रण देण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी लगेच होकार कळवला, असं देखील शरद पवार म्हणालेत.

भोवताली वणवा पेटला असताना आत्ममग्न राहणाऱ्यांना काळ माफ करणार नाही; शरद पवारांनी साहित्यिकांचे कान टोचले

तर यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुम्ही दिल्लीमध्ये साहित्य संमेलनासाठी दिवस अतिशय चांगला निवडलाय. मराठीबाबत विचार करताना मला संत ज्ञानेश्वर यांच्या ओळी आठवतात. मराठी भाषा ही अमृताहून गोड असल्याच्या भावना पीएम मोदींनी व्यक्त केल्यात.मी मराठी भाषेतील शब्द शिकण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्राच्या भूमीतील एका महापुरुषाने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची स्थापना केली. गेल्या 100 वर्षांपासून संघ काम करतोय. माझ्यासारख्या लाखो लोकांना देशासाठी जीवन समर्पित करण्याची प्रेरणा संघामुळे मिळालीय, असं देखील नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube