VIDEO : ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके, मराठी अमृताहून गोड’…दिल्लीत PM मोदींचं मराठीत भाषण

VIDEO :  ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके, मराठी अमृताहून गोड’…दिल्लीत PM मोदींचं मराठीत भाषण

PM Modi Inaugurate 98th Akhil Bhartiya Marathi Sammelan : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sammelan) उद्घाटन दिल्लीमध्ये पार पडले. यावेळी देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी सारस्वातांना माझा नमस्कार,असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरूवात केली. दिल्लीमध्ये (Delhi) या साहित्य संमेलनाचं आयोजन होतंय. एक भाषा किंवा एका राज्यापुरतं हे आयोजन नाहीये.

मराठी साहित्य संमेलनात आझादीच्या लढाईची महक, सांस्कृतीची विरासत आहे. ज्ञानबा-तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्लीतून अतिशय मनापासून अभिवादन करते, असं मोदी म्हणालेत. अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पहिल्या आयोजनापासून आतापर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रवासाचे साक्षीदार आहेत. आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिवस अतिशय चांगला निवडला असं मोदी (PM Modi News) म्हणालेत.

इतिहासाचा गौरव करणे महान पण… छावाबाबतच्या आक्षेपार्ह विधानानंतर स्वरा भास्करचा युटर्न!

यावेळी मोदी म्हणाले की, माझ्या मराठीचे बोलु कौतुके…मराठी भाषा अमृताहून जास्त गोड आहे. त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीप्रती असणारं माझं प्रेम तुम्हाला चांगलं माहितंय. मराठी बोलण्याचा प्रयत्न, मराठीचे नवीन शब्द शिकण्याचा प्रयत्न मी नेहमीच केलाय, असं देखील ते म्हणालेत.

महाराष्ट्राच्या धर्तीवर मराठीभाषा एका महापुरूषाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचं बीज रोवलं होतं. ते आता मोठं वटवृक्ष झालंय. माझं सौभाग्य आहे की, माझ्यासारख्या लाखो लोकांना आरएसएसने देशासाठी जगण्याची प्रेरणा दिलीय. संघामुळेच मला मराठी भाषा आणि मराठी परंपरेसोबत जोडण्याची संधी मिळाली. याच कालखंडात काही महिन्यांपूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. हे काम पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. देशात आणि जगात बारा करोडपेक्षा जास्त लोक आहेत.

पुण्यात गुंडाराज, गजा मारणेच्या टोळीनं पुन्हा तरूणाला बेदम मारलं; पोलीस अधिकारी काय म्हणतात?

भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही. तर संस्कृतीची संवाहक आहे. भाषा समाजात जन्म घेतात, परंतु समाज निर्माणात तितकीच महत्वाची भूमिका बजावते. समर्थ रामदासांच्या पंक्तींचे यावेळी त्यांनी उदाहरण दिले. मराठीमध्ये शुरता आणि विरता आहे. सौंदर्य अन् संवेदना आहे. समानता आणि समरसता देखील आहे. आधुनिकता पण भक्ती, शक्ती आणि युक्ती मराठीत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

भारत देशाला जेव्हा अध्यात्मिक उर्जेची गरज पडली. तेव्हा संतांनी मराठी भाषेत त्याला मांडलं. महाराष्ट्राच्या अनेक संतांनी भक्ती आंदोलनांच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. शेकडो वर्षांच्या कालखंडात मराठी भाषा जयघोष बनली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीप्रभू यासारख्या मराठी विरांनी दुश्मनांना मजबूर केलं, असं मोदी भरसभेत म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube