भोवताली वणवा पेटला असताना आत्ममग्न राहणाऱ्यांना काळ माफ करणार नाही; शरद पवारांनी साहित्यिकांचे कान टोचले

  • Written By: Published:
भोवताली वणवा पेटला असताना आत्ममग्न राहणाऱ्यांना काळ माफ करणार नाही; शरद पवारांनी साहित्यिकांचे कान टोचले

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025 : 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) होत आहे. या संमनेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे आहेत. त्यांनी आपले छापील भाषण प्रसिद्ध केले आहेत. त्यात त्यांनी साहित्यिकांचे कान टोचले आहेत. भोवताली वणवा पेटले असताना आत्ममग्न राहणाऱ्यांना काळ माफ करणार नाही, असे पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

काळ झपाट्याने बदलत आहे. काळाबरोबर समाजासमोरची आव्हानेही बदलत आहेत. समाजाला या आव्हानांची जाणीव करून देण्याबरोबरच त्यांचा सामना करण्यासाठीची मनोभूमिका तयार करण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. साहित्य माणसे जोडण्याचे काम करते. परंतु सध्या समाजाच्या एकात्मतेची वीण त्यामुळे उसवत असल्याचे चित्र दिसते. समाज अत्यंत कठीण आणि नाजूक परिस्थितीतून जात असताना साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे. राजकारणामुळे बिघडलेली समाजाची घडी दुरुस्त करण्याची जबाबदारी साहित्यिकांनी आपल्या खांद्यावर घ्यायला हवी, अशी अपेक्षा शरद पवारांनी केली आहे. हे जादूच्या कांडीसारखे ते काम लगेच होणार नाही. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न व्हायला हवेत. भोवताली वणवा पेटला असताना आत्ममग्न राहणाऱ्यांना काळ माफ करणार नाही, असेही पवारांनी म्हटले आहे.

मूठभर लोकांचा साहित्यावर वर्चस्वाचा डाव, पवार म्हणाले, “साहित्य संस्थांनी आता..”

वारकरी परंपरांचे भान ठेवून महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, न्या. रानडे, र. धों. कर्वे, आगरकर वगैरे सुधारकांच्या वाटेने समाजाला नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे.

छाया कदम यांचा पुरस्कारांचा सिलसिला कायम; पुणे फिल्म फेस्टीवलमध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी
पूर्वी पुस्तकांसाठी ग्रंथालयांवर अवलंबून राहावे लागायचे. सुविधा मुबलक नव्हत्या तरीही वाचनसंस्कृती रुळली होती. आता साधने वाढली परंतु वाचनाला अनेक पर्याय आले. दूरचित्रवाणी आली. मनोरंजनाच्या वाहिन्या आल्या, वृत्तवाहिन्या आल्या. स्मार्टफोन आले. माणसांना गुंतवून ठेवणारी अशी अनेक साधने आली, असे असले तरी पुस्तके मोठ्या प्रमाणावर छापली जात आहेत. चांगली पुस्तके खपलीही जात आहेत. गावोगावी ग्रंथप्रदर्शने भरवली जात आहेत. त्या माध्यमातून लोकांपर्यंत पुस्तके पोहोचत आहेत. तरीसुद्धा नव्या पिढीला पुस्तकांशी बांधून ठेवण्यासाठी नव्या माध्यमांचा कल्पकतेने वापर करायला हवा. नव्या पिढीमध्ये साहित्याची गोडी टिकून राहिली तरच साहित्याला भवितव्य असेल. त्यादृष्टीने शाळेपासून प्रयत्न करावयास हवेत. यामध्ये शासनाबरोबरच शिक्षकांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मराठी शाळा टिकल्या तर मराठी साहित्य टिकेल. याचा विचार करून शिक्षकांनी त्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावयास हवेत. मुलांच्यामध्ये वाचनाची गोडी लागण्यासाठी विविध उपक्रम राबवायला हवेत. सकस वाचणारे वाचक वाढले पाहिजेत. तालुका, गावपातळीवर वाड्.मयीन उपक्रम वाढले पाहिजेत. गाव तिथे ग्रंथालय – योजना पूर्वी होती. गाव तिथे ग्रंथप्रदर्शन हा उपक्रम राबवावला पाहिजे. युवा पिढी साहित्य व्यवहाराशी जोडून राहिली तरच सुसंस्कृत आणि नव्या विचारांची पिढी साहित्याच्या माध्यमातून घडू शकेल, याचे भान ठेवायला हवे, असे शरद पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube