मूठभर लोकांचा साहित्यावर वर्चस्वाचा डाव, पवार म्हणाले, “साहित्य संस्थांनी आता..”

Sharad Pawar : अखिल भारतीय मराठी साहित्याचा महामेळा आजपासून राजधानी दिल्लीत रंगणार आहे. यावर्षी दिल्लीत होत असलेल्या या साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तब्बल सात दशकांनंतर मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. (Marathi ) दरम्यान, शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तर मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे आहेत. डॉ. तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. दरम्यान, आज दुपारपासून या संमेलनाला सुरुवात झाली. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी मनोगत व्यक्त केले. मूळ प्रश्न तसेच आहेत. काळाच्या ओघात आणखीही नवीन प्रश्न तयार झाले आहेत. अशा प्रश्नांना भिडण्याचा प्रयत्न संमेलनाने करायला हवा. पण मूठभर लोक साहित्यावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या तक्रारी येत असतात हे योग्य नाही, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.
शरद पवारांनी आपल्या भाषणात महात्मा ज्योतीबा फुले यांच्या एका पत्राचा उल्लेख केला. पवार म्हणाले, महात्मा ज्योतीराव फुले यांनी ग्रंथकार सभेस लिहीलेल्या पत्राचा उल्लेख मुद्दाम करावासा वाटतो. त्या पत्राकडे आणि त्या अनुषंगाने उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. ज्योतिरावांनी पहिल्या संमेलनावेळी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची आपली 140 वर्षांनी तरी तयारी आहे किंवा नाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मूळचे प्रश्न जसेच्या तसेच आहेत.
एक मत मिळवलं अन् वाजपेयींचं सरकार पाडलं.. शरद पवारांनी पहिल्यांदाचा केला खुलासा
शिवाय काळाच्या ओघात अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा प्रश्नांना भिडण्याचा प्रयत्न संमेलनाने करायला हवा. तरच साहित्याचा प्रवाह जिवंत खळाळता राहील. साहित्य ही कुणा ठराविक वर्गाची मक्तेदारी नाही. हे यशवंतराव चव्हाण यांनी पन्नास वर्षांपूर्वी ठणकावून सांगितले होते. तरीसुद्धा मूठभर लोक साहित्य क्षेत्रावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या तक्रारी ऐकू येत आहेत. हे योग्य नाही. साहित्य क्षेत्रातील जु्न्या संस्थांनी आधिक व्यापक बनायला हवे. आपण करतो तेच खरे कार्य असा अहंकार किमान साहित्य क्षेत्रातील संस्थांनी बाळगू नये, असे शरद पवार म्हणाले.
असहिष्णूता फारशी चांगली नाही
जनमानसात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण लेखणी झिजवली. तर मनापासून समाधान वाटेल. आम्ही चुकीच्या रस्त्याने जात असलो तरी परखडपणे लिहीण्याची भूमिका घेतली तर त्याचेही स्वागत आमच्या क्षेत्रातले बहुतांशी लोक करतात. स्तुतीपाठकांच्या गर्दीपेक्षा परखडपणे सुनावणारा साहित्यिक महत्वाचा असतो. अशा रोखठोक भूमिका घेणाऱ्यांशी संवाद ठेवण्यातच सत्तेचे शहाणपण असते. दु्र्दैवाने अलीकडच्या काळात टीका करणारा, विरोधी लिहीणारा तो विरोधक मानण्याची प्रथा रुढ होत चालली आहे ही असहिष्णूता फारशी योग्य नाही, असेही शरद पवार म्हणाले.