Sanjay Raut on PM Modi : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे सध्या मद्य धोरण घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. केजरीवाल यांना मधुमेहाचा गंभीर आजार आहे. पण, तुरुंगात त्यांना मधुमेहाची औषधे मिळवण्यात अडचणींचा सामना करावा लागलत आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
YRF ला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; चित्रपटातून गाणे काढून टाकल्याप्रकरणी भरपाई द्यावी लागणार नाही
आज संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, तुरुंगात असताना मलाही औषधं मिळतं नव्हती. असाच काहीसा अनुभव केजरीवाल यांनाही येत आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. मात्र तुरुंगात त्यांना औषधे दिली जात नाहीत. सरकार आणि तुरुंग प्रशासनाने थोडी माणुसकी दाखवावी. केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. ते एक सामाजिक कार्यकर्ताही आहे. हे सरकार त्यांना त्यांचे औषध देत नाही. त्याच्या कुटुंबीयांना त्यांच्यापर्यंत औषधे पोहोचू दिली जात नाहीत. याचा अर्थ तुम्ही त्यांना जेलमध्ये मारण्याचा प्रयत्न करत आहात का?, असा सवाल राऊतांनी केला.
घर घर मोदी चालतं मग जय भवानी का नाही? राऊतांचा निवडणूक आयोगासह भाजपवर घणाघात
जर आम्हालाच अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य कैद्यांची काय अवस्था असेल. दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही अशाच अडचणींचा सामना करावा लागत आहे. राजकीय सूड घेण्यासाठी तुम्ही या लोकांना तुरुंगात टाकले, आता निदान त्यांचे औषध तरी त्यांना द्या, असं राऊत म्हणाले.
मोदी-शहांचे सरकार दुष्ट सरकार
राऊत म्हणाले, आणीबाणीच्या काळात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी असे अनेक मोठे नेते तुरुंगात होते. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतः वेगवेगळ्या तुरुंगातील तुरुंग अधिकाऱ्यांशी बोलत होत्या. ज्या तुरुंगात या नेत्यांना ठेवण्यात आले होते, तेथे त्यांची योग्य व्यवस्था आहे की नाही, हे त्या पाहायच्या. त्यांना औषध, अन्न मिळते की नाही याची माहिती घ्यायच्या. पण, देशातील मोदी-शहांचे खतरनाक आणि दुष्ट सरकार असे काही करत नाही. ते मुख्यमंत्र्यांना औषध घेऊ देत नाहीत, अशी घणाघाती टीका राऊतांनी केली.
बकवास हिंदुत्ववादी सरकार
दिल्लीतील निर्वाचन आयोगाचं नाव बदलून भाजप निवनिर्वाचन आयोग करावं, महाराष्ट्रात जय भवानी किंवा हर हर महादेव ह्या घोषणा पिढ्यानपिढ्या दिल्या जातात. आजवर कोणीही त्यावर बंदी घातली नव्हती, अगदी काँग्रेसच्या राज्यातही असे कधी झाले नव्हते. तुमचं नमो-ढमो चालंत, पण, हिंदू धर्मातील एक शब्दही चालत नाही, हे बकवास हिंदुत्ववादी सरकार आहे, अशी टीका राऊतांनी केली.