Download App

‘नक्कल करुन स्वत:ची कुवत दाखवतात’; दादांच्या मिमिक्रीवर तटकरेंनी सुनावलं

Sunil Tatkare On Jitendra Awhad : नक्कल करुन प्रत्येक जण स्वत:ची कुवत दाखवून देत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरेंनी (Sunil Tatkare) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी चांगलच सुनावलं आहे. दरम्यान, मुंबईतील प्रदेश कार्यायातून सुनिल तटकरेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते बोलत होते.

‘देशमुखांच्या शेती प्रदर्शनाला नेहरुंनीही भेट दिली होती’; शरद पवारांकडून आठवणींना उजाळा

तटकरे म्हणाले, नक्कल करणाऱ्या माणसाची लोकं योग्यवेळी नक्कल करतात. त्यांची ती घमेंडी असते. अशा पद्धतीने नक्कल करुन प्रत्येक जण आपली कुवत काय हे दाखवून देतो. अशा लोकांना यापेक्षा अधिक महत्व मी देत नाही. राज्यातील जनतेत अजितदादा किती लोकप्रिय हे दाखवून दिलं आहे. त्यामुळे बोलघेवड्या, प्रसिद्धीसाठी हापापलेल्या व्यक्तीच्या वक्तव्यावर मी बोलू इच्छित नसल्याची प्रतिक्रिया सुनिल तटकरेंनी दिली आहे.

मोठी बातमी! कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल, भूपिंदरसिंग बाजवांकडे कुस्तीची कमान

यावेळी बोलताना तटकरेंनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. लातूर तसेच विविध भागातील लोकांचे पक्षप्रवेश वाढत आहेत. पक्षाची ताकद वाढत आहे. संघटना वाढविण्यासाठी वाहनं देण्यात याव्यात ही मागणी होती. त्यानूसार आम्ही वाहने देण्याची मागणी मान्य केली असल्याचं तटकरेंनी सांगितलं आहे.

Aankh Micholi Serial: ‘स्टार प्लस’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, सासू-सुनेची नवी ‘आँख मिचोली’!

मराठा समाजाला आरक्षण कायद्याच्या चौकटीत मिळणार असं आश्वासन दिलं आहे. महायुतीची सरकारला कालावधी मिळायला हवा, असं मोठं विधानही सुनिल तटकरेंनी यावेळी केलं आहे. तसेच कांद्याचा निर्णय हा केंद्राचा निर्णय असून सीएम डीसीम जातील त्यावेळी ते मिळून निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

शुबमनने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीय का? कसोटी कारकीर्द लागलीय पणाला

पळून जातील म्हणून दोन माणसंही देतील : आव्हाड
प्रत्येकाला गाडीला बांधून ठेवायचे आहे, म्हणजे ते पळून जाणार नाहीत. अजित पवार गटाला पळणाऱ्यांची खूप भीती आहे. निवडणूक जाहीर करा, मग उद्या बघा किती पळापळ होईल. अजित पवार गट ४० काय ४०० गाड्यांचं वाटप करतील. निवडणूक जाहीर झाल्यावर कोणीही पळून जाऊ नये म्हणून गाड्यांसोबत दोन माणसंही त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी देतील , अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.

follow us