‘देशमुखांच्या शेती प्रदर्शनाला नेहरुंनीही भेट दिली होती’; शरद पवारांकडून आठवणींना उजाळा
Sharad Pawar : स्वातंत्र्यानंतर नवी दिल्लीत पंजाबराव देशमुखांनी (Punjabrao Deshmukh) आयोजित केलेल्या शेती प्रदर्शनाला खुद्द पंडित जवाहरलाल नेहरु आणि डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यासह जगभरातील अनेक नेत्यांनी भेट दिल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
व्हायरल संगीतकार ते अभिनेता म्हणून तोंडभरून कौतूक, अपारशक्तीसाठी 2023 ‘या’ कारणाने ठरलं खास
शरद पवार म्हणाले, पंजाबराव देशमुखांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी धारण केली. त्यानंतर त्यांनी भारतात शेती क्षेत्राकडे विशेष लक्ष दिलं. देशमुखांनी शेतीत आधुनिकता आणण्यासाठी प्रयत्न केले. शेतीसाठी पंजाबरावांचं मोठं योगदान लाभलं आहे. स्वातंत्र्यांनतर पंजाबरावांनी दिल्लीत पहिल्यांदा कृषीविषयक सर्वात मोठं राष्ट्रीय प्रदर्शन आयोजित केलं होतं. या प्रदर्शनाला पंडित नेहरु, राजेंद्रप्रसाद यांच्यासह जगभरातील इतर नेत्यांनी भेट दिली असल्याचं सांगत शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Mumbai News : शरद पवारांबाबत वादग्रस्त लिखाण; उच्चशिक्षित तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
तसेच देशमुखांसाठी शेतकरी हाच त्यांचा आधार होता. शेतकऱ्यांसाठी आपलं आयुष्य, ज्ञान द्यावं, हीच त्यांची भूमिका राहिली होती. शिक्षणसंस्थेची निर्मीती करुन त्यांनी हजारो मुलं त्यांनी शिकवली आहे. आज त्यांचाच आदर्श घेऊन अनेकांनी शेती क्षेत्रात काम केलं आहे, त्यांच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Israel Embassy परिसरात स्फोट; दिल्लीमध्ये खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू
माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात आला आहे. याप्रसंगी नितीन गडकरी यांनी शरद पवारांचे गोडवे गायल्याचं दिसून आलं आहे. ते म्हणाले, कृषी क्षेत्रात डॉ. पंजाबराव देशमुख यांचं नाव मोठं आहे. पंजाबराव देशमुखांच्या नावे देण्यात येणार पुरस्कार शरद पवारांना देण्यात आलायं. शरद पवार यांचही नाव मोठंच आहे. आता या पुरस्काराने आणखी मोठी उंची गाठली आहे, शरद पवार यांच्या उंचीची माणसं दरवर्षी कुठं मिळणार? असा मिश्किल अंदाजात सवाल करीत नितीन गडकरींनी पवारांचे गोडवे गायले आहेत.
या पुरस्कारामध्ये शरद पवारांना पाच लाख रुपयांचा धनादेशही देण्यात आला आहे. मात्र शरद पवार यांनी या धनादेशात आणखी 15 लाख रुपयांची भर घालून एकूण 20 लाख रुपयांच्या रक्कमेतून देशमुखांच्या शिक्षणसंस्थेत काम करणाऱ्या आदर्श महिला शेतकऱ्याचा सन्मान करावा, अशी विनंती हर्षवर्धन देशमुख यांच्याकडे केली आहे.