व्हायरल संगीतकार ते अभिनेता म्हणून तोंडभरून कौतूक, अपारशक्तीसाठी 2023 ‘या’ कारणाने ठरलं खास

  • Written By: Published:
व्हायरल संगीतकार ते अभिनेता म्हणून तोंडभरून कौतूक, अपारशक्तीसाठी 2023 ‘या’ कारणाने ठरलं खास

Aparashakti Khurana : अभिनेता आयुष्यमान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुराना (Aparashakti Khurana) याने त्याच्या मोठ्या भावाप्रमाणेनच मनोजरंजन क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. बॉलीवूडच्या रोमांचक जगात अपारशक्ती खुरानाने 2023 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करून पुन्हा एकदा त्याने आपण उत्तम अभिनेता आणि संगीतकार आहे हे दाखवून दिलं आहे. 2023 मध्ये त्याचे कुडिये नी हे गाणे व्हायरल झालं. सोबतच एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्याच्या कामाचं भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक देखील झालं आणि त्याने पुरस्कार देखील मिळवले.

शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी! सेन्सेक्स अन् निफ्टीनं गाठला ऑल टाईम हाय… 

दरम्यान, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तो क्रिकेट टीमचा कप्ता होता. त्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रात येण्याचं धाडस केलं. त्याने अभिनयाशिवाय, आरजे म्हणूनही काम केलं. तो कॉमेडी करण्यातही माहिर आहेतच. पण, तो उत्तम गायकदेखील आहे. 2023 मध्ये अपारशक्ती खुरानाचे “कुडिये नी” हे गाणे व्हायरल झालं होतं. इंस्टग्रामच्या रील्समध्ये चार्ट-टॉपिंग सेन्सेशन बनलं. या गाण्याने त्याच्या मनमोहक आवाजाला जगभरात पोहचवलं.

अभिनयाच्या कारकिर्दीत अ‍ॅमेझॉन प्राइमच्या “ज्युबिली” मधील त्याच्या भूमिकेसाठी त्याने अनेक पुरस्कार पटकावले. “ज्युबिली” मध्‍ये मदन कुमारच्‍या त्‍यांच्‍या भूमिकेला व्‍यापक प्रशंसा मिळाली.

Panchak: ‘चमत्कार’ सांगणार आयुष्याचा भावार्थ ‘पंचक’मधील हृदयस्पर्शी गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला 

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्यांच्या अतुल साबेरवाल दिग्दर्शित ‘बर्लिन’ या चित्रपटाने प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये धुमाकूळ घातला. ऑक्टोबर 2023 मध्ये लॉस एंजेलिसच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला आणि 67 व्या BFI लंडन फिल्म फेस्टिव्हल आणि Jio MAMI मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्येही तो प्रदर्शित करण्यात आला. त्याच्या उत्तम कथानकासाठी आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी या चित्रपटाने भरपूर प्रशंसा मिळवली. अपारशक्तीच्या सोबतीने बर्लिनमध्ये राहुल बोस, कबीर बेदी आणि इश्वाक सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

अपारशक्ती खुराणा याने यंदाच वर्ष त्याच्या कामाने याद गार तर केलंच. पण त्याने खूप कौतुक देखील मिळवलं. 2024 मध्ये तो अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स करणार आहे. सोबतीला सगळेच बर्लिनच्या रिलीजची वाट पाहत आहेत. अपारशक्ती स्त्री 2 मध्ये पुन्हा झळकणार आहे आणि अॅपलॉज एंटरटेनमेंटचा ‘फाइंडिंग राम’ ही डॉक्युमेंटरी तो करणार आहे.

अपारशक्तीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात त्याने आमिर खानच्या पुतण्याची भूमिका साकारली. यानंतर त्याने ब्रदीनाथ की दुल्हनियामध्ये काम केलं. ‘स्त्री’मध्येही त्याने महत्वाचा रोल साकारला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube