शुबमनने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीय का? कसोटी कारकीर्द लागलीय पणाला

शुबमनने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीय का? कसोटी कारकीर्द लागलीय पणाला

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) पहिल्या कसोटी सामन्यात शुभमन गिल (Shubhaman Gill) पुन्हा एकदा फलंदाजीत फ्लॉप ठरला. शुभमन केवळ 12 चेंडू खेळून 2 धावा करून बाद झाला. शुभमनने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सुरुवात केली, पण त्यानंतर त्याने स्वतःहून ठरवले की त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे. शुभमनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यापासून त्याचा फॉर्म खराब होत गेला.

मात्र, शुभमन गिलने तिसर्‍या क्रमांकावरुन करिअरला सुरुवात केली होती. यामुळेच त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी टीम इंडियाच्या व्यवस्थापनाकडे मागणी केली होती पण त्याचा हा निर्णय कदाचित त्याच्या विरोधात जात आहे.

कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच; विनेश फोगटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला

यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये शुभमनची फलंदाजी
यंदाच्या कसोटी क्रिकेटमध्ये शुभमन गिलची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. 2023 मध्ये आतापर्यंत शुभमनने एकूण 9 कसोटी डावांमध्ये फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने फक्त एकदाच 30 पेक्षा जास्त धावांची इनिंग खेळली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 128 धावा केल्या होत्या. त्याशिवाय, कसोटी चॅम्पियनशिप फायनलपासून तो वेस्ट इंडिजमध्ये समाधानकारक कामगिरी करू शकला नाही.

SA vs IND : पहिल्याच दिवशी रबाडाने भारताची दाणादाण उडविली; केएलने एकतर्फी खिंड लढविली !

स्वत: गिलने संघ व्यवस्थापनाशी चर्चा करताना तिसऱ्या क्रमांकावर म्हणून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावातही तो केवळ 2 धावा करून बाद झाला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube