पुणे : विविध मागण्यांसाठी पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन बघता पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. यामागण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्याने पोलिसांची मोठी पळापळ झाली.
यावेळी विद्यार्थ्यांनी वर्णनात्मक परीक्षेला आमचा विरोध नाही, मात्र त्यासाठी तयारी करण्यास पुरेसा वेळ आणि स्पर्धा समान पातळीवर असावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर नवीन पॅटर्न 2025 मध्ये लागू करा, पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. सुमारे एक हजार विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा जून 2023 मध्ये असून लाखो विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आहे. त्यात पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणे आव्हानात्मक असते. त्यामुळे पूर्व परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी किमान 5 ते 6 महिने वेळ मिळण्याची गरज आहे. अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात यावी. अशा मागण्या या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.