Bhaskar Jadhav On BJP : विदर्भात विशेषतः पूर्व विदर्भात पूर्वीपासूनच शिवसेनेला (Shivsena)मोठा जनाधार होता. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग त्याही वेळेला होता आणि आजही आहे. मात्र भाजपानं मैत्रीच्या नावाखाली आपलं बुद्धिचातु्र्य वापरुन प्रत्येकवेळी आमच्यातला एकेक माणूस त्यांनी पराभूत केल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group)आमदार भास्कर जाधव यांनी लेट्सअपशी बोलताना केला.
विधानसभेत भाजप आमदारानं गुणगुणलं रफींचं गाणं; दाद देत फडणवीसांनी दिली ग्वाही
आमदार भास्कर जाधव म्हणाले की, शिवसेनेतली काही माणसं भाजपनं दिलेल्या त्रासाला कंटाळूनच सोडून गेली. त्यानंतर मग आता तुमचा इथला प्रमुख माणूसच निघून गेला तो तुमच्याबरोबर नाही. मग ही जागा आम्हाला द्या आम्ही प्रयत्न करतो, असं करत करत भाजपनं आपली पकड निर्माण केली. आज आम्ही भाजपपासून दूर झालो आहोत. पूर्व विदर्भामध्ये शंभर टक्के शिवसेना ठाकरे गटाला यश मिळवून देणार म्हणजे देणार असा विश्वास आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे.
‘महायुतीत जाताना रोहित पवारांना विचारलंही नाही’; सुनिल शेळकेंनी सांगितलं खरं
कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी नियतीनंच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं असावं. आत्ता कोरोनाचं संकट नसतानाही हॉस्पिटलमध्ये दोन-दोन दिवसांमध्ये लोकं मरत आहेत. हे जर राज्यकर्ते कोरोनाच्या काळात असते तर महाराष्ट्राची काय अवस्था झाली असती? याचा विचार नियतीनं केला होता, असंही ते यावेळी म्हणाले.
बाकी पक्षाचं नुकसान झालं हे खरं आहे पण कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र वाचला हे तर मान्यच करायला हवं, असंही यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.
शिवसेनेमध्ये बंड केलेल्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. विधानसभेत शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची सुनावणी सुरु आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या आमदारांकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले जात आहेत. महाविकास आघाडीतून आम्ही आधीच बाहेर पडणार होतो असेही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी हे सर्व ढोंग आहे, खोटं आहे हे आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं.
शिंदे गटाकडून असं सांगण्यात येतं की, शिवसेना आणि भाजपनं एकत्रित निवडणूक लढवली, त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाणं आम्हाला मान्य नाही. तर अडीच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये का राहिलात? तुम्ही मंत्रिपदाची शपथ का घेतली? त्याचवेळी या गोष्टींसाठी विरोध का केला नाही? असा सवालही यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. त्यांनी लेट्सअपशी विविध विषयांबद्दल संवाद साधला. शिंदे गटानं आता हे पाप केलंच आहे. त्यामुळे आता टीका करायची म्हणून आणि दोष द्यायचा म्हणून ते बोलत आहेत, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही असेही यावेळी आमदार जाधव म्हणाले.