Balasaheb Thackeray: मराठी अस्मिता जपणारा झुंजार नेता, बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यातील दुर्मिळ क्षणचित्रं…

  • Written By: Published:
1 / 8

बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यातील दुर्मिळ क्षणचित्रं…

2 / 8

शिवसेना स्थापन झाल्यानंतर बघता बघता हे संघटन संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले होते. त्यानंतर तत्कालीन प्रमुख पक्षांनादेखील बाळासाहेबांना विचारात घेऊनच आपले राजकीय डावपेच आखावे लागत. सध्या तर महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री आहे.

3 / 8

बाळासाहेब ठाकरे फक्त राजकारणी होते असं नव्हे. तर ते एक उत्तम वक्ता, व्यंगचित्रकार, संपादक तसेच कलेची जाण आणि आदर ठेवणारे व्यक्तीमत्व होते.

4 / 8

शिवसेनेला वाढवण्यासाठी, तिच्या शाखा गाव खेड्यात पोहोचवण्यासाठी बाळासाहेबांनी अपार कष्ट घेतले. त्यांनी लाखोंच्या सभा गाजवल्या. त्यांच्या सभेला लोकांची प्रचंड गर्दी असे

5 / 8

बाळासाहेबांचा एक इशारा म्हणजे महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी ती आज्ञाच असे. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात बाळासाहेबांची ख्याती होती. दिल्लीचे बडे नेते बाळासाहेबांचे चांगले मित्र होते.

6 / 8

बाळासाहेब ठाकरे – शरद पवार मैत्रीचे, जनतेसमोर न आलेले महत्वपूर्ण पैलू

7 / 8

माजी पर्यटनमंत्री तथा बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांनी आपल्या आजोबांसोबतचा वरील खास फोटो...

8 / 8

बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे किस्से, त्यांच्या खास आठवणी, पक्षीय राजकारणापलीकडची नाती, साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती यांच्यावर असलेलं बाळासाहेबांचं प्रेम, बाळासाहेबांचे राजकीय निर्णय, त्यांचं व्यापक हिंदुत्व, त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेलं त्यांचं विशेष प्रेम या आठवणींवर आज प्रकाश टाकण्यात येतोय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube