आरोप करणं सुषमा अंधारेंच्या अंगलट; भाजप आमदाराकडून विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव

Devyani Farande Vs Sushma Andhare : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणी भाजपच्या आमदारांवर आरोप करणं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या चांगलच अंगलट येत असल्याचं दिसून येत आहे. एका निनावी पत्राच्या आधारे सुषमा अंधारेंनी अप्रत्यक्षपणे भाजप आमदार देवयांनी फरांदेंवर (Devyani Farande) आरोप केले होते. त्यावरुन आता अधिवेशनात फरांदे यांच्याकडून सुषमा अंधारे […]

Sushma Andhare

Sushma Andhare

Devyani Farande Vs Sushma Andhare : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणी भाजपच्या आमदारांवर आरोप करणं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या चांगलच अंगलट येत असल्याचं दिसून येत आहे. एका निनावी पत्राच्या आधारे सुषमा अंधारेंनी अप्रत्यक्षपणे भाजप आमदार देवयांनी फरांदेंवर (Devyani Farande) आरोप केले होते. त्यावरुन आता अधिवेशनात फरांदे यांच्याकडून सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

20 Years: अर्शद वारसीच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ला पूर्ण झाली 20 वर्ष! अभिनेता पोस्ट लिहीत म्हणाला…

अधिवेशनादरम्यान फरांदे बोलताना म्हणाल्या, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या गल्लीबोळात लढणाऱ्या नेत्या असतील. सुषमा अंधारेंनी पुण्यात माझ्याविरोधात पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत अंधारेंनी एका निनावी पत्रावरुन माझ्यावर गंभीर आरोप केले आहेत. मी मागील 30 वर्ष राजकारणात विविध पदांवर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत आहे. मी आजपर्यंत कुणावरही पुरावा नसताना आरोप केला नाही. या ताईंकडे काही पुरावे असतील तर त्यांनी गृहमंत्र्यांना द्यावे, असं खुलं चॅलेंजचं फरांदे यांनी दिलं आहे.

IPL Auction : वडिलांकडून मारण्याचा प्रयत्न पण आईने दिले जीवनदान, राजस्थानने खरेदी केलेल्या पॉवेलचा खडतर प्रवास

तसेच सुषमा अंधारे यांनी १८ नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी त्याच दिवशी गृहमंत्र्यांना पत्र देऊन आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी केली. पोलीस आयुक्तांनाही पत्र दिलं होतं. मागील 4 अधिवेशन मी सातत्याने ड्रग्सविरोधात लढा देत आहे. नाशिकला ड्रग्समुक्त करण्यासाठी मी लढत असल्याचंही फरांदेंनी स्पष्ट केलं आहे.

माझ्याकडे असलेली ड्रग्स पेडलरची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर सोलापूरपासून नाशिकपर्यंत ड्रग्सचे कारखाने उघडकीस आले. मी या विषयावर सातत्याने बोलतेय. मात्र, ललित पाटील हे ठाकरे सेनेचे असल्याने माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. याबाबत मी पुराव्यासह विधानसभेत हक्कभंग सुषमा अंधारेंवर दाखल करावा, अशी मागणीच फरांदे यांनी केली आहे. फरांदे यांनी हक्कभंगाची मागणी करताच विधानसभा अध्यक्षांनी तुम्ही प्रस्ताव सादर करण्यास सांगितलं, त्यानंतर या प्रकरणावर उचित निर्णय घेण्यात येणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.

सुषमा अंधारे पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या होत्या?
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाशी संबंधित एक निनावी पत्र मला मिळालं आहे. हे पत्र मी पुणे पोलिसांना दिलं असून पत्रातील संदर्भामध्ये कोणताही पुरावा नाही. पत्रात छोटी भाभी उर्फ शेखला अटक केली तर बडी भाभी कोण? असं म्हणत सुषमा अधारेंनी अप्रत्यक्षपणे फरांदेंवर आरोप केले होते.

Exit mobile version