संजय राऊत नशा करतात, त्यांची नार्को टेस्ट करा; देवयानी फरांदेंची मागणी

  • Written By: Published:
संजय राऊत नशा करतात, त्यांची नार्को टेस्ट करा; देवयानी फरांदेंची मागणी

Devyani Farande On Sanjay Raut : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर बेछुट आरोप करत आहेत. या प्रकरणात राज्यातील काही मंत्र्यांचा समावेश असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. फडणवीस हे भरकटल्यासारखे बोलतात, ते भांग पित नसतील, त्यांना वासानेच नशा येत असेल असं वक्तव्य राऊतांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा आता भाजप आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी जोरदार समाचार घेतला.

शाई फेक झाली की शर्ट बदलतो अन् तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो : चंद्रकांतदादा पाटील 

भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. संजय राऊत हे मनोरुग्ण झाले आहेत किंवा तेच ड्रग्ज घेत आहेत, असं फरांदे म्हणाल्या.

आज माध्यमांशी बोलतांना फरांदे म्हणाला की, राज्यातील ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश करण्याचे काम राज्य सरकार करत आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसही या सगळ्याचा तपास करत आहेत. असं असतांना संजय राऊत हे बेताल वक्तव्य करत आहेत. सकाळी सकाळी ते जे आरोप करतात,त्यावरून एक तर ते मनोरुग्ण आहेत किंवा ड्रग्ज घेत असतील. त्यामुळं संजय राऊत यांचीही नार्को चाचणी करावी, असं त्या म्हणाल्या.

फरांदे म्हणाल्या, ललित पाटील आणि ड्रग्ज प्रकरणात उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट राजकारण करत आहे. ललित पाटील हा शिवसेनेचा होता. त्यामुळं ललित पाटीलकडून संजय राऊतांना हप्ते जात होते का? ठाकरेंच्या सेनेला हप्ते जायचे काय? असा सवालही फरांदे यांनी केला.

ठाकरे गटाकडून बेछूट आरोप केले जात आहे. पण, ललित पाटील हा त्यांच्या गटाचा होता. आता त्याला अटक झाल्यानंतर त्यांचा थयथयाट सुरू झाला. ड्रग्ज प्रकरणात ठाकरे गटाने विनाकारण खोटे आरोप करू नयेत. ठाकरे गटाने यापूर्वी मोर्चा का काढला नाही? असा सवाल त्यांनी केला.

राऊतांची टीका काय? 
ठाकरे गटाने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढला. यावेळी संजय राऊत यांनी सत्तेत असलेल्यांवर जोरदार टीका केली. ललित पाटील यांच्या मैत्रीणी विधानसभेपर्यंत आहे. आणि येथून त्यांना हप्ते दिले जातात. सत्तेत बसलेल्या आमदारांचा या प्रकरणात सहभाग आहे. यामध्ये सहा आमदार सहभागी असून प्रत्येकाला 16 लाखांचा हप्ता मिळतो.मात्र, फडणवीस हे त्यांना पाठीशी घालताहेत. फडणवीस भांग पित नसतील, पण त्यांना वासानेच नशा येते, अशी टीका त्यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube