Download App

Letsupp Exclusive : संभाजीराजेंचा पत्ता कट; कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती काँग्रेसचे उमेदवार

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर (Kolhapur) मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhtrapati) यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यांना काँग्रेसच्या तिकीटावर मैदानात उतरविण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याचाच अर्थ शाहू महाराज छत्रपती यांचे चिरंजीव आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचा पत्ता कट झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ही जागा काँग्रेसला (Congress) देण्याचे मान्य केल्यानंतर शिवसेनेला कोणती जागा मिळणार यावर सध्या चर्चा सुरु आहेत. (name of Shahu Maharaj Chhatrapati is almost final as the Mahavikas Aghadi candidate from Kolhapur constituency for the Lok Sabha elections)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मागील आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांनी शाहू महाराज यांची भेट घेतली होती. यावेळी महाराजांनी देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी दाखविली. फक्त शिवसेनेऐवजी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यास अधिक बरे राहिल, अशी विनंती त्यांनी केली. “मी जय पराजयाचा विचार करणार नाही, पण मूल्यांसाठी निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण सक्षमतेने उतरेन,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याच दिवशी संध्याकाळी शरद पवार हे सतेज पाटील आणि बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूरमध्येच भेटले. शाहू महाराज छत्रपती यांच्यासह सर्वच नेत्यांनी एकत्रित भोजन केले. शाहू महाराज आमच्याकडे येणार असतील आनंदच आहे, अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्यांनी खुशी व्यक्त केला.

अजितदादांसारखी फसवणूक होऊ नये म्हणून सांभाळून राहा; विखेंचा रोहितदादांना खोचक सल्ला

मात्र शिवसेनेची समजूत कशी काढायची असा प्रश्न उपस्थित होताच शरद पवार यांनी तिथूनच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना फोन केला आणि ही जागा आपल्याला शाहू महाराज यांच्यासाठी काँग्रेसला द्यायची आहे असे स्पष्ट केले. या सगळ्या घडामोडींमुळे शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. ते देखील बोलताना तसे संकेत देत आहेत. तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येईल, असे ते कोल्हापूरच्या लोकांना सांगत आहेत. ही ब्रेकिंग न्यूज ऐशोआरामासाठी नाही तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी असणार आहे, त्यासाठी मला तुमचे मार्गदर्शन देखील लागणार आहे, असे त्यांनी काल एका कार्यक्रमात सांगितले.

उद्धव ठाकरेंनी एकतरी जागा जिंकून दाखवावी, भाजप नेत्याचं ओपन चॅलेंज

या सगळ्या घडामोडींमुळे शाहू महाराज छत्रपती यांचे पुत्र संभाजीराजे छत्रपती यांचा कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतून पत्ता कट झाला आहे. महाविकास आघाडी की स्वराज्य संघटना असा पेच त्यांच्या समोर होता. मात्र 2009 मधील पराभवामुळे संभाजीराजे हे पुरेशा क्षमतेने निवडणुकीत लढत देतील की नाही याची खात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांना न वाटल्याने त्यांनी शाहू महाराज छत्रपती यांनाच गळ घातली. त्यामुळे शाहू महाराज यांच्या उमेदवारीची घोषणा काँग्रेसच्या पहिल्या यादीतच होण्याची शक्यता आहे. तर संभाजीराजे छत्रपती यांना निवडणूक लढविण्याची इच्छा असल्यास अन्य मतदारसंघाची चाचपणी करावी लागणार आहे.

follow us

वेब स्टोरीज