उद्धव ठाकरेंनी एकतरी जागा जिंकून दाखवावी, भाजप नेत्याचं ओपन चॅलेंज
Girish Mahajan : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतशा राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येत आहे. सातत्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ठाकरे गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गटावर निशाणा साधला आहे. शिवसेनेने राज्यात एकतरी जागा जिंकून दाखवावी असं खुलं आव्हानं महाजन यांनी दिलं. एवढचं नाही तर शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणून दाखवावं, असं महाजन यांनी म्हटलं.
भाजप नेते बंडखोर का होत नाहीत? ‘पॉलिटिक्स’ संपण्याची भीती की आणखी काही…
भाजपने पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना खुले आव्हान दिले आहे. गिरीश महाजन यवतमाळमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी महाजन यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज यवतमाळमध्ये महिला बचत गटांचा महामेळावा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या मेळाव्यावरून महाविकास आघाडीने मोदींच्या सभेवर टीका केली. त्यानंतर आता महाजन यांनी विरोधकांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली.
ए एम खानविलकर लोकपालचे नवे अध्यक्ष; आव्हाड म्हणाले, ‘आणखी एक संस्था मोदींनी ताब्यात घेतली…’
महाजन म्हणाले की, यांच्याकडे चार -सहा आमदार खासदारही नाहीत. यांची अवसथा कशी आहे, हे शेंबड्या पोरालाही माहिती. आहे. स्वत:च्या बाबतीत इतका गैरसमज असता कामा नये. पंतप्रधान मोदी देशभरात फिरतात, आज ते तीन राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी हे उद्धव ठाकरेंना किंवा पवांरांना घाबरले आहेत. आणि म्हणून मोदीजी महाराष्ट्राय येत आहेत, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, असं महाजन म्हणाले.
ते म्हणाले की, तसेच आम्ही 400 पार करण्याबाबत बोललो, मी त्यांना सांगतो की त्यांनी किमान एक जागा निवडून आणावी. पवार साहेबांनी लेक सुप्रिया सुळे यांची जागा निवडून आणावी. उद्धव ठाकरेंनी एखादी जागा निवडून आणावी. उगाच मी वाघ आहे, असं दाखवायचं. मांजराने वाघाचं कातडं घातल्यासारखा हा प्रकार आहे, असं महाजन यांनी म्हटलं.
मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यातील अनेक दैनिकांमध्ये महायुतीकडून मोदींच्या स्वागतात्या जाहिराती देण्यात आल्या आहेत. मात्र, त्या जाहिरातीत खासदार भावना गवळी यांचा फोटो गायब आहे. याविषयी विचारले असता महाजन म्हणाले की, मी अजून वर्तमानपत्र पाहिलं नाही. जाहिराती पाहिल्या नाही. पक्षाकडून जाहिरातील दिल्या असतील तर गोष्ट वेगळी आहे. पण, महायुतीकडून गवळींना डावलल्या जात नाही, असं महाजन म्हणाले.