Chhatrapati Sambhajiraje यांचं मुंडे भावा-बहिणीवर टीकास्त्र, म्हणाले…

Chhatrapati Sambhajiraje यांचं मुंडे भावा-बहिणीवर टीकास्त्र, म्हणाले…

Chhatrapati Sambhaji Raje On Munde : बीडच्या परळीमध्ये छत्रपती संभाजीराजे अ‍ॅडवोकेट माधव आप्पा जाधव मित्र मंडळ संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी छत्रपती संभाजीराजे आले होते. त्यांनी जाहीर सभा घेतली. तसेच तब्बल दोन तास त्यांची भव्य रॅली देखील पार पडली. यावेळी त्यांनी देश राज्यातील राजकीय स्थितीवर टीका केली. तसेच त्यांनी परळीतील सद्धस्थितीवरही टीका केली. यामध्ये त्यांनी नाव न घेता भाजप नेत्या पंकंजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात दहशत नव्हती. मात्र परळीतील दहशत आणि सावकारी कमी झालेली नाही. मला येथिल हा प्रकार पाहून धक्का बसला असलंही यावेळी संभाजीराजे म्हणाले. तसेच सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीतील धोरणं बदलली पाहिजेत. दुष्काळ, ओला दुष्काळ, गारपीट या आस्मानी संटकातीन शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पावलं उचलली पाहिजेंत असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना मुख्यमंत्री शिंदेंचे अभिवादन

तसेच ते पुढे म्हणाले की, बीडमध्ये खासगी सावकारीमुळे दरवर्षी 15 ते 20 लोकांचा बळी जातो. येथील दहशत हा बिहार, उत्तरप्रदेशप्रमाणे झाली आहे. त्यामुळे परळीमधील दहशत संपवायची असेल आणि विकास करायचा असेल तर स्वराज्य पार्टीत या असं आवाहन देखील छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे. दरम्यान यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी 2024 च्या निवडणूकांमध्ये आपला स्वराज्य संघटना पक्ष उतरणार असल्याचं देखील घोषित केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube