Download App

महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे, मतांची चोरी करून सरकार स्थापन; पटोलेंचा नव्या सरकारवर पहिला वार

निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झालेय, हे गुजरातधार्जिणे सरकार.

  • Written By: Last Updated:

Nana Patole : अखेर 13 दिवसांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्राला (Maharashtra) नवा मुख्यमंत्री मिळाला. मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) आज महायुतीच शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होताच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) जोरदार हल्लाबोल केला.

अजित पवारांचा नवीन विक्रम, सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ 

निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झालेय, हे गुजरातधार्जिणे सरकार आहे, अशी टीका पटोलेंनी केली.

नाना पटोलेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. चोरीचे बहुमत असतानाही नव्या सरकारची स्थापनाच वादाने झाली असून या तीन पक्षातील अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशात मलीन झाली आहे. महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे सरकार बसले असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये, असं पटोले यांनी म्हटले आहे.

मी ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..,;एकनाथ शिंदेंचं नव्या सरकारमध्ये कमबॅक, उपमुख्यमंत्रिपदी विराजमान 

नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महायुतीकडे बहुमत असतानाही सरकार स्थापन्यासाठी कसरत करावी लागली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना या सरकारमध्ये फारसे महत्व दिले जाईल असे वाटत नाही. दिल्लीत वाऱ्या करुन मंत्रीपदांची भीक मागण्याची वेळ या दोघांवर आली. मोदी शाह यांच्या मेहरबानीवर शिंदे, अजित पवार सरकारमध्ये असतील. एकनाथ शिंदे यांची तर भाजपाला आता काहीच गरज नाही. त्यामुळे बहुमत मिळाल्यापासूनच शिंदे आणि अजित पवारांना भाजप, मोदी-शाह यांनी जागा दाखवून दिली आहे, अशी टीका पटोलेंनी केली. भाजपाने पुन्हा एकदा दोन प्रादेशिक पक्षांना संपवल्याचं पटोले म्हणाले.

संख्याबळ कमी, पण हिंमत कायम…
पुढं बोलतांना ते म्हणाले, भाजपचे सरकार स्थापन झाले असून निवडणूकीत त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागतील. शेतकरी कर्जमाफी, कृषी पंपाची विज बिल माफ, लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये, २.५ रिक्त सरकारी पदांची भरती याची तातडीने अंमलबजावणी करावी. काँग्रेस पक्षाची विधानसभेतील संख्या कमी झाली आहे. परंतु हिम्मत आणि ताकद कायम असून जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

follow us