Download App

राणेंना लोकशाही मान्यच नाही, ही सत्तेची गुर्मी; नितेश राणेंच्या वक्तव्याचा पटोलेंनी घेतला समाचार

  • Written By: Last Updated:

Nana Patole : वेगवेगळ्या मुद्द्यांवरील भूमिकेमुळं चर्चेत राहणारे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा चिथावणीखोर विधान केलं. पोलिसांसमोर सांगतो, पोलीस माझं काहीही वाकडं करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला, असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) खरपूस समाचार घेतला. नितेश राणेंचं हे वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारं आहे. अशा लोकांना लोकशाही मान्यच नाही, ही सत्तेची गुर्मी आहे, अशी टीका पटोलेंनी केली.

श्रीलंका क्रिकेटला मोठा दिलासा ! आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यावरील बंदी आयसीसीने उठवली 

नाना पटोले हे आज नांदेड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यांना नितेश राणेंच्या वक्तव्याविषयी विचारलं असता ते म्हणाले की, अशा लोकांना लोकशाही मान्यच नाही, महाराष्ट्रात हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून शाहू-फुले-आंबेडकरी विचार नष्ट करण्याचे पाप अशा मंडळीकडून होत आहे. हे सर्व काही भयंकर आहे, महाराष्ट्रातील जनता भाजपला माफ करणार नाही, सत्तेची गुर्मी असलेले लोक अशी वक्तव्ये करतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

ओबीसींच्या तोंडचा घास सरकारने पळवला, मराठा आरक्षणाचा मुसदा रद्द करा; भुजबळांची सरकारकडे मोठी मागणी 

प्रकाश आंबेडकर हे मविआत सहभागी होतील
वंचित बहुजन आघाडीचा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झाला नाही. याविषयी विचारलं असता पटोले म्हणाले की आज देशात संविधान धोक्यात. ते वाचवणं ही महाविकास आघाडीची भूमिका आहे. आणि तिच वंचित बुहजन आघाडीचीहीभूमिका आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे आमच्यासोबत आघाडीत सहभागी होतील, असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला.

नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले, हे विधान अत्यंत गंभीर आहे. अशी विधाने कोणी करू नयेत. सत्ताधारीच नाही तर कोणीही अशी वक्तव्य करू नये. राज्यात आणि देशात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर सत्ताधारी पक्षातील लोकांनी जबाबदारीने बोलले पाहिजे, असं चव्हाण म्हणाले.

काय म्हणाले नितेश राणे?

एका कार्यक्रमात बोलतांना नितेश राणे म्हणाले की, माझं पोलीस काही वाकडं करू शकत नाहीत. हे मी पोलिसांसमोर बोलतो. सागर बंगल्यावर आपला बॉस बसलाय. जर एखादा अधिकारी आपल्याकडे वाकड्या नजरेनं पाहत असेल तर त्याच्या कानाखाली 12 मारल्याशिवाय गप्प बसायचं नाही. हिंदूंच्या कार्यक्रमांमध्ये कोणती गाणी वाजवली जावीत हे सांगणारे अधिकारी कोण? असा सवाल करत राणेंनी प्रशासनावर जहरी टीका केली.

follow us