Download App

गणेशोत्सव झाल्यावर मराठवाड्यात जाणार, तो काय करतो बघू; राणे जरांगेंनी भिडणार

मी गणेशोत्सव संपताच मराठवाड्यात जाणार आहे. सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करणार. बघूत तर जरांगे काय करतो? - नारायण राणे

  • Written By: Last Updated:

Narayan Rane : भाजप नेते आणि खासदार नारायण राणेंन (Narayan Rane) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) आव्हान दिलं. गणेशोत्सव झाल्यावर मराठवाड्यात जाणार असल्याचं राणे म्हणाले. तर मराठवाड्यात गेल्यावर जरांगे काय करतो बघू, अशी टीकाही राणेंनी केली. कोकणातील भाजपच्या बैठकीत राणे बोलत होतं.

फडणवीस साहेब सत्तेच्या शेवटच्या काळात तरी महाराष्ट्राची वाट लावू नका; रोहित पवारांचा निशाणा 

सिंधुदुर्ग भाजपच्या विस्तारित कार्यकारिणीचे अधिवेशनाचे उद्घाटन नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलतांना राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उठसूठ टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जशास तसं उत्तर देऊ. ठाकरे सतत पंतप्रधानांवर टीका करतात. पंतप्रधाधांनी तुमच्या कुठल्या कामात व्यत्यय आणला नाही, मग का आमच्या मोदीसाहेबांवर तुम्ही बोलतो. अमित शाह, फडणवीसांवरवर टीका करता. पण, फडणवीस एकटे नाहीत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असं राणे म्हणाले.

भारतासाठी उद्याचा दिवस महत्वाचा, लोव्हलिना-लक्ष्य सेनकडे सर्वांचे लक्ष, जाणून घ्या वेळापत्रक 

पुढं बोलतांना राणेंनी जरांगेवरही निशाणा साधला. ते म्हणाले, मी गणेशोत्सव संपताच मराठवाड्यात जाणार आहे. सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करणार. बघूत तर जरांगे काय करतो, असं आव्हान राणेंनी दिलं.

या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, माजी शहराध्यक्ष संजू परब, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, महेश सारंग, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब आदी उपस्थित होते.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुक होईल. सन 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी प्रयत्न केला. मात्र, 145 आमदार विजयी झाले नाहीत. आपल्यावर झालेला विश्वासघात लक्षात घेऊन येत्या साडेतीन महिन्यात भाजपने 145 चा जादुई आकडा गाठण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला पाहिजे, असं चव्हाण म्हणाले.

follow us