फडणवीस साहेब सत्तेच्या शेवटच्या काळात तरी महाराष्ट्राची वाट लावू नका; रोहित पवारांचा निशाणा
Rohit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. फडणवीस यांच्याकडे जलसंपदा आणि ऊर्जा ही दोन्ही खाती आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राला कंगाल करून जाण्याचे जे स्वप्न पाहात आहेत, ते राज्यातील जनता कधीही पूर्ण होऊ देणार नाही, अशा इशारा त्यांनी दिला. सत्तेच्या शेवटच्या काळात तरी महाराष्ट्राची वाट लावू नका, असे आवाहन त्यांनी फडणवीसांना केलं.
भारतासाठी उद्याचा दिवस महत्वाचा, लोव्हलिना-लक्ष्य सेनकडे सर्वांचे लक्ष, जाणून घ्या वेळापत्रक
#कंत्राटीकरण-खाजगीकरण आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे या सरकारमधील #serious समीकरण आहे. उठसुठ खाजगीकरण करण्याचा सपाटा लावणाऱ्यांकडून आता राज्यातील वीज प्रकल्पांचे खाजगीकरण करून परराज्यातील कंपन्यांच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे.
फडणवीस साहेब सत्तेच्या शेवटच्या काळात तरी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 3, 2024
राज्य सरकारने आपले जुने जलविद्युत प्रकल्प खासगी संस्थांना चालवायला देण्याचा निर्णय घेतला. कॅबिनेट बैठकीत झालेल्या या निर्णयानुसार राज्यातील 16 प्रकल्प खासगी संस्थांना देण्यात येणार आहेत. महावितरणकडे केवळ 9 जलविद्युत प्रकल्प राहणार आहेत. जलसंपदा विभागाने आधुनिकीकरणाच्या नावाखाली हा निर्णय घेतला आहे. यावरून रोहित पवारांनी फडणवीसांवर टीका केली. रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की,कंत्राटीकरण-खाजगीकरण आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे या सरकारमधील सिरीयस समीकरण आहे. उठसुठ खाजगीकरण करण्याचा सपाटा लावणाऱ्यांकडन आता राज्यातील वीज प्रकल्पांचे खाजगीकरण करून परराज्यातील कंपन्यांच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
हा फक्त एकच लेटरबॉम्ब, आमच्याकडे अनेक लेटरबॉम्ब पडून…; रावसाहेब दानवेंचा इशारा
पुढं त्यांनी लिहिलं की, फडणवीस साहेब सत्तेच्या शेवटच्या काळात तरी महाराष्ट्राची वाट लावू नका. असो, आपल्याकडे जलसंपदा आणि ऊर्जा दोन्ही खाते आहेत म्हणून आपण महाराष्ट्राला कंगाल करून जाण्याचे जे स्वप्न पाहात आहात, ते राज्यातील जनता कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिला.
मविआ सरकार आल्यानंतर हा महाराष्ट्रविरोधी निर्णय तात्काळ मागे घेतला जाईल, त्यामुळे भाजपला निवडणुक दक्षिणा देऊन सरकारी वीज प्रकल्प बळकावू पाहणाऱ्या कंपन्यांनी देखील या भानगडीत पडू नये आणि सरकारला खासगीकरणाची एवढीच आवड आहे तर सरकारी प्रकल्पांचे खाजगीकरण करण्याऐवजी राज्यात खाजगी गुंतवणूक आणण्यासाठी आपले कौशल्य वापरावीत, असंही रोहित पवार म्हणाले.