Swati Maliwal Case : आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालीवाल मारहाण (Swati Maliwal Case) प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत विभव कुमारला ताब्यात (Bibhav Kumar) घेतलं आहे. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये त्याचं नाव आहे. ताब्यात घेतल्यानंतर आता दिल्ली पोलीस विभव कुमारची चौकशी करतील. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या (Arvind Kejriwal) सीएम आवास येथून विभव कुमारला ताब्यात घेण्यात आले. यानंतर पोलीस त्यांना सिव्हिल लाइन्स स्टेशनमध्ये नेण्यात आले. विभव कुमार यांचे म्हणणे आहे की त्यांना मीडियीच्या माध्यमातून एफआयआरची माहिती मिळाली. विभव कुमार यांनीही ई मेलच्या माध्यमातून तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल पोलिसांनी घ्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा Swati Maliwal यांच्यासोबतच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल
स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्यावेळी त्या सीएम केजरीवाल यांच्या घरी पोहोचल्या त्यावेळी विभवने त्यांना मारहाण केली. यानंतर स्वाती मालीवाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. यानंतर मालीवाल यांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. या अहवाला असे म्हटले आहे की स्वाती यांच्या डाव्या पायावर आणि उजव्या डोळ्याच्या खाली जखमेचे निशाण आहे. स्वाती यांनी डोकेदुखी आणि मानेला त्रास होत असल्याचीही तक्रार केली आहे.
सूत्रांकडील माहितीनुसार विभव कुमार यांनी दिल्ली पोलिसांना तक्रारीचा मेल केला होता. पोलिसांनी त्यांचा आयपी अॅड्रेस ट्रॅक केला. त्यानंतर पोलिसांचं एक पथक त्यांच्या मागावरच होतं. अखेर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
‘मोदीजी हिम्मत असेल तर डोळ्यात डोळे घालून निवडणूक लढा’,केजरीवाल यांचा मोदींवर निशाणा
दुसरीकडे भाजपने पत्रकार परिषद घेत या प्रकरणात भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणात आम आदमी पार्टी विभव कुमारचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप भाजपने केला. याआधी आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी पत्रकार परिषद घेत स्वाती मालीवाल भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात राजकारणही जोरात सुरू आहे.