Prakash Ambedkar : यंदा लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. अमरावती मतदारसंघातून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) विद्यमान खासदार आहेत. यंदाही त्या निवडणूक लढण्यासाठी इच्छक आहेत. त्यांनी जोरदार तयारी देखील सुरू केली. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी खासदार नवनीत राणा यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. येत्या ६ महिन्यात नवनीत राणा जेलमध्ये दिसतील, असा दावा आंबेडकर यांनी केला. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
तिथे शरद मोहोळ आहे मला ठेवू नका.. तेव्हा संजय दत्तही घाबरला होता…
प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केल. यावेळी त्यांना आमदार रवी राणांबाबत प्रश्न विचारण्यात आला. गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान रवी राणा यांनी तुमचा पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. आता या निवडणुकीतही तुम्ही पाठिंबा देणार का? असा सवाल आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर बोलताना आंबेडकरांना जात वैधत प्रमाणणपत्रावरून मोठा दावा केला. रवी राणाची मिसेसे कोर्टात घिरट्या घालत आहे. सहा महिन्यामध्ये ती जेलमध्ये दिसेल, असं आंबेडकरांनी म्हटलं.
‘वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हायला हवीत’, शरद पवार यांनी व्यक्त केली भावना
कॉंग्रेस दुटप्पी
महाविकास आघाडीत अद्याप वंचितचा समावेश झाला नाही. त्यावही आंबेडकरांनी भाष्य केलं. महाविकास आघाडीतील नेत्यांशी वंचितच्या समावेशाविषयी शिवसेना बोलली. मात्र, त्यांनी अद्याप काहीही सांगिलतं. मोदींना सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. कॉंग्रेस एकीकडे हो म्हणते, पण दुसरीकडे काहीच निर्णय देत नाही. ही दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका त्यांनी केली. ठाकरे गटाशी आमची युती आहे. आमचा लोकसभेचा फॉर्म्युला 24-24 असा ठरला, असंही आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांनी आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून लोकसभा जिंकली होती. त्यावेळी नवनीत राणा यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप अडसूळ यांनी केला होता. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. याशिवाय त्यांनादोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, याच प्रकरणावरून आंबेडकरांनी राणांबाबत मोठा दावा केला आहे. त्यावर आता नवनीत राणा काय प्रत्युत्तर देणार हेच पाहणं महत्वाचं आहे.