‘वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हायला हवीत’, शरद पवार यांनी व्यक्त केली भावना

‘वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हायला हवीत’, शरद पवार यांनी व्यक्त केली भावना

Sharad Pawar: अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे हस्ते उद्घाटन झालं आहे. यावेळी स्वागताध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पडदा बाजूला सारत नाट्य संमेलनाचं अनावरण केलं. नाटक हे ज्ञान आणि मनोरंजनाचे साधन आहे. निखळ मनोरंजन करणारी, आशयप्रधान आणि  वास्तवावर भाष्य करणारी नाटकं  व्हायला हवीत. प्रायोगिक व व्यावसायिक, बाल रंगभूमीला विशेष अनुदान राज्य सरकारने दिले पाहिजे.

तसेच ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, तिकीट दरात कपात व्हावी अशी अपेक्षा 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, चित्रपटसृष्टी आधी हजारो वर्ष सर्वाधिक प्रभावी माध्यम ही रंगभूमी होती. मात्रा आता  जवळपास सर्व निर्माते कलाकार हे हिंदी चित्रपटाकडे वळत आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमी ओस पडत आहे. तसेच हल्ली डिजिटल माध्यमातही नाटकं सादर होतात. मात्र त्यामध्ये रंगभूमीचा जीवंतपणा नसतो असेही पवार यांनी सांगितले.

CM शिंदेंसमोर प्रशांत दामले म्हणाले, ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’

100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा आज पिंपरी- चिंचवड येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, उमा खापरे, अण्णा बनसोडे, श्रीरंग बारणे, उदय सामंत, अभिनेते मोहन जोशी, अशोक हांडे, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले. अ. भा. म. नाट्य परिषद पिंपरी शाखेचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष सुरेशकुमार साकला, उपाध्यक्ष नरेश गडेकर, अ. भा. म. नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज