Download App

साहेबांच्या मनातलं नाही, दादांच्या मनातलं कळतं… पण; जयंत पाटलांचं तिरकस विधान

शरद पवार यांच्या मनातलं कळणं अवघड पण दादांच्या मनातलं कळत पण बोलणार नाही, असं तिरकस विधान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय.

Jayant Patil News : शरद पवार यांच्या मनातलं कळणं अवघड पण दादांच्या मनातलं कळत पण बोलणार नाही, असं तिरकस विधान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil News) यांनी केलंय. यावेळी जयंत पाटलांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘व्हिजन २०५०’ या कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते.

आमची इज्जत गेली, पंकजाच्या पराभवाची सल अद्यापही मनात, धनंजय मुंडेंनी बीडमध्ये बोलून दाखवलं

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या राज्यात सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अजित पवार गटाकडून राज्यभराच जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं. अजितदादांच्या या विधानाबाबत जयंत पाटील यांनी सवाल करण्यात आलं होतं. त्यावर बोलताना अजितदादांच्या मनातलं कळतं पण बोलणार नसल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच जास्त काळ शरद पवारांसोबत राहिल्याने त्यांच्या मनातील मला कळतं, पण अमित शाह यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललेय हे कळत नसल्याचंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलंय.

Sharad Pawar: शरद पवार 30 वर्षांनंतर लालबागचा राजाच्या चरणी, जावई आणि नातीसोबत घेतलं दर्शन, पाहा फोटो

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
मोठ्या पवारांच्या मनातलं कळणं अवघड असतं, दादांच्या मनातलं कळतं पण मला बोलायचं नाही, मला माहित आहे ते काय करु शकतात आणि काय होणार आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून रस्सीखेच सुरु असल्याची परिस्थिती आहे. एकीकडे महायुतीकडून शिवसेना, भाजप, अजित पवार गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाहांचा आजच महाराष्ट्र दौरा पार पडला. या दौऱ्यात अमित शाहांनी जागावाटपादरम्यान सर्व घटकपक्षांचा मान राखला जाईल, अशी हमी देण्यात आलीयं.

follow us