आमची इज्जत गेली, पंकजाच्या पराभवाची सल अद्यापही मनात, धनंजय मुंडेंनी बीडमध्ये बोलून दाखवलं

  • Written By: Published:
आमची इज्जत गेली, पंकजाच्या पराभवाची सल अद्यापही मनात, धनंजय मुंडेंनी बीडमध्ये बोलून दाखवलं

Dhananjay Munde On Pankaja Munde : विधानसभा निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष कार्यकर्त्यांसह मेळावे घेत आहे. अशाच एक मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून बीड (Beed) शहरात सोमवारी आयोजित करण्यात आला होता. बीड विधानसभा मतदारसंघात बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांच्या उपस्थित अल्पसंख्याक मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्यात बोलताना लोकसभा निवडणुकीत फक्त 6 हजार मतांनी आमची इज्जत गेली. ही खूप खोलवर झालेली जखम आहे आणि अद्याप ही जखम भरलेली नाही असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले.

या मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवाची सल अद्यापही मनात आहे. फक्त सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली. ही जखम खोलवर झालेली आहे आणि ती अद्याप भरून निघालेली नाही, असं धनंजय मुंडे या मेळाव्यात म्हणाले. तसेच महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात मौलाना महामंडळासाठी दीड हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती मात्र सरकारने दमडीही दिली नाही. त्यानंतर अजितदादा या सरकारमध्ये आले आणि निधी मंजूर केला असा दावा देखील धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यात बोलताना केला.

तर दुसरीकडे या मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी सामनाच्या अग्रलेखातील टीकेला देखील प्रत्युत्तर दिले आहे. या मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, मला बोलायला अतिशय दुर्दैव वाटत आहे. जर आज स्वर्गीय बाळासाहेब असले असते तर त्यांना वाईट वाटले असते. स्वर्गीय मुंडे साहेब नसताना त्यांचं नाव घेऊन त्यांना आज बदनाम करण्यात येत आहे. मुंडे साहेबांची बदनामी करणे हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शोभत नाही.

2024 Hyundai Alcazar पॅनोरॅमिक सनरूफ अन् क्रूझ कंट्रोलसह लाँच, किंमत 14.99 लाख रुपये

संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेना पूर्णपणे पाण्यात घातल्याशिवाय राहणार नाही. मुंडे साहेब असताना काहीही बोलले नाहीत ते नसताना त्यांच्याबद्दल बोलताना संजय राऊतांना लाज वाटली पाहिजे असं देखील यावेळी धनंजय मुंडे म्हणाले. गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून भाजपने शिवसेनेच्या जागा पाडण्यासाठी प्रयत्न केले, त्यासाठी खतपाणी घातले, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातुन करण्यात आली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube