Download App

मी जातीवंत 96 कुळी मराठा; फडणवीस भेटीच्या चर्चेवर ‘त्या’ नेत्याचे प्रत्युत्तर

Abhijit Patil On Bhagirath Bhalke : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अभिजीत पाटलांच्या पक्ष प्रवेशाने दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) नाराज झाले होते. यानंतर भालकेंनी अभिजीत पाटलांवर मोठा आरोप केला होता.

सागर बंगल्यावर जाऊन अभिजीत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले आणि माझा पक्ष प्रवेश फसवून झाला असल्याचे सांगितले, असा दावा भगीरथ भालके यांनी केला होता. त्याला आता अभिजीत पाटील यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

Disha Patani Birthday: अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् कोट्यवधींची मालकीण झाली!

अभिजीत पाटील म्हणाले की,  मी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या अगोदर सगळ्या पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत होतो. याचे कारण साखर कारखानदारी करत असताना सरकारची मदत घ्यावी लागते. मला वेळोवेळी सगळ्यांनी मदत केली. त्याबद्दल मी त्याचे जाहीर आभार मानले. माझ्याविरोधात जी बातमी आली होती ती चुकीची होती. त्यानंतर मी त्या पत्रकारांशी देखील बोललेलो आहे, असे पाटील म्हणाले.

तसेच  सागर बंगल्यावर आत्ताच्या काळामध्ये मी गेलो नाही. ते म्हणतात तेव्हा तर मी गेलोच नाही. मी त्यांना भेटलेलो नाही. त्यांना भेटायचा काही प्रश्न नव्हता, असे म्हणत अभिजीत पाटलांनी फडणवीसांच्या भेट घेतल्याचे नाकारले आहे. तसेच यापुढे माझ्या कारखान्याच सभासदांसाठी मी राज्यातीलच नाही तर देशातील कोणत्याही नेत्याचे पाय धरायची तयारी आहे. परंतु माझ्या वैयक्तिक गोष्टीसाठी मी कधीही कुणाचे पाय धरले नाही आणि धरणारही नाही. मी जातीवंत 96 कुळी मराठा आहे, असे अभिजीत पाटलांनी ठणकावून सांगितले.

‘अभिजीत पाटील यांनी फडणवीस यांच्या पायावर लोळण घेतली’

काय म्हणाले होते भगीरथ भालके 

सागर बंगल्यावर जाऊन अभिजीत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले आणि माझा पक्ष प्रवेश फसवून झाला असल्याचे सांगितले, असा दावा भगीरथ भालके यांनी केला होता. सात तारखेला शरद पवार यांच्या उपस्थित अभिजीत पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला होता. त्यावेळी आम्ही सर्वांनी त्यांचे पक्षात स्वागत आहे अशी भूमिका घेतली होती. पण पक्ष प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी अभिजीत पाटील हे सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले आणि मला फसवून पक्ष प्रवेश झाला असे सांगितले, असा दावा भगीरथ भालके यांनी केला.

Tags

follow us