Ajit Pawar angry On NCP Workers : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज पुण्यामध्ये आढावा बैठक पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अजित पवार यांनी बोलताना पक्षातील नेत्यांना सज्जड दम दिला आहे. लोकांची काम करण्यासाठी तुम्हाला पदं दिली आहेत, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले आहे.
राष्ट्रवादी काँग्रसेच्या बैठकीत अजितदादांनी बोलताना कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी कार्यकर्त्यांना सुनावले आहे.लोकांची काम करण्यासाठी तुम्हाला पदं दिली आहे. मुळशीच्या लोकांना पदं दिली नाही म्हणून भांडयाचं नाही, नाही तर एकेकाच्या कानाखाली आवाज काढील बाकी काही नाही करायचो. याच्यातून तुमची नाही तर आमची बदनामी होते, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना दम भरला आहे. यामुळे पवारसाहेबांची बदनामी होते. हा कोणता फाजिलपणा चालला आहे, असे ते म्हणाले.
वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु केले आहे. त्यापार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवारांनी जाहीरपणे आपल्या उमेदवारीविषयी भाष्य केले आहे. शिरुर लोकसभेमधून सध्या राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे हे खासदार आहेत. पण राष्ट्रवादीचेच विलास लांडे यांनी या जागेवरुन लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
तसेच या व्यतिरिक्त इतरही अनेक जागांवरुन उमेदवारांनी आपापली इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे अजितदादांनी लेकी बोले सुने लागे या म्हणीप्रमाणे कार्यकर्त्यांना सुनावताना पक्षातील इच्छुक उमेदावारांनाच दम भरल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आदी नेतेमंडळी उपस्थित होती.