Eknath Khadse Vs Devendra Fadnvis : राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. अधिवेशनामध्ये विरोधकांकडून विविध मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना चांगलच घेरलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जळगाव जिल्ह्यातील कॅसिनो, अवैध धंदे, कट्ट्याविरोधात आवाज उठविला. त्यावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि एकनाथ खडसे यांच्या सवाल-जवाबाचं चांगलच सत्र रंगल्याचं पाहायला मिळालं. मी आत्तापर्यंत 52 पत्र दिल्याचं खडसेंनी सांगितलं त्यावर तुम्ही पत्र नाहीतर पुरावे द्या, असं कडक शब्दांत फडणवीसांनी ठणकावून सांगितलं आहे.
Russia : पुतिन यांचे कट्टर विरोधक नवलनी तुरुंगातून बेपत्ता; नेमकं काय घडलं रशियात?
एकनाथ खडसे म्हणाले :
पुराव्यानिशी तक्रार करणं हा माझा स्वभाव आहे. सभागृहात मी पुरावाच देत असतो. मी दिलेल्या पत्रांची चौकशी गृहमंत्री फडणवीसांकडून व्हावी. सर्वजण फडणवीसांना सज्जन, सुस्कंृत मानतात मीही मानतो पण कामाच्या बाबतीत अकार्यक्षम आहेत. गृहमंत्रीपदासाठी कार्यक्षम सक्षम करायची असेल तर जळगाव जिल्ह्यातील जुगार, अड्डे अवैध धंद्यांची यादी मी तुम्हाला देतोयं पिस्तुलाचा कारखाना आहे. गेल्या 35 वर्षांपासून सुरु आहे. आमच्याकडे कट्टे गल्लोगल्ली मिळतात. शेकडो लोकं पोलिसांनी पकडले आहेत. पोलिसांनाही वरपर्यंत द्यावे लागतात. माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे, जसं तुम्ही कॅसिनो बंद केलं तसेच अवैध धंदे कट्टा बंद करणार आहात का? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच जळगावात कोणाचे अड्डे? कोण किती पैसे घेत? त्याचे पत्ते फोन नंबर दिलेले आहेत. अनेक वर्ष झालेत दिले आहेत मग एका वर्षांत अजूनही कारवाई झाली नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
राजकीय आशिर्वादानेच अवैध धंदे :
फडणवीसांचं मला अनेक वर्षे मार्गदर्शन लाभलं आहे. त्याचाच लाभ घेऊन मी सभागृहात बोलत आहे. अवैध धंदे बंद करावेत बस्स. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळेच निर्माण होतात
वर्ष झालंयं मी मागणी करतोयं. तुमचा राजकीय आशिर्वाद म्हणूनच धंदे सुरु आहेत, त्यामुळे सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असंही खडसे म्हणाले आहेत.
‘CM शिंदेंच्या नावाने बिल्डरांकडून सेटलमेंट’; अधिवेशनात आव्हाड-देसाईंमध्ये खडाजंगी
एकनाथ खडसेंच माझ्यावर खूप प्रेम, ते जगप्रसिद्ध आहे माझंही त्यांच्यावर प्रेम आहे. माझ्याकडे दिलेले पत्र मी चौकशीसाठी पाठवतो. तुम्ही लिहिलं म्हणजे तो पुरावा झाला का? असा पुरावा असतो का? तुमच्यासारखा सिनियर माणूस असं करतो का? तुमच्याबरोबर मी पोलिस पाठवतो तुम्ही दिलेल्या पत्रांची छाननी केली त्यात अर्ध्या ठिकाणी लक्षात आलं की तुमच्या राजकीय विरोधकांची नावे दिली आहेत. अशी कारवाई होत नाही . आपण सोबत काम केलं आहे ते नाथाभाऊ कुठे गेले? पुरावे 104 द्या नूसते पत्र देऊ नका, आमची कार्यक्षमता उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्याचं प्रमाणपत्र महाराष्ट्र आम्हाला देतो. तुमच्या मागणीचं स्वागत आहे ही भूमिका कठोरपणे सर्वांसाठी ठेवा. ही भूमिका सर्वांसाठी राहिली तर मीच काही पुरावे सभागृहात आणणार
तुम्ही पुराव्यासहित माहिती द्याल त्यावर कारवाई होणार असल्याचं देवेंद्र फडणीसांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे सभागृहात बोलत असताना उपसभापती नीलम गोर्हे यांनी खडसेंना वेळेवरुन हाटकताच एकनाथ खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्हाला अजून किती वेळ लागणार आहे, असा सवाल गोर्हे यांनी केल्यानंतर एकनाथ खडसेंनी सभागृहातच संताप व्यक्त केला आहे. बिलाच्या बाहेर मी बोलणार नाही फडणवीसांकडून कारवाई होत नसेल तर सभागृहाचा एखादा मिनिट घ्यावा की नाही? असा उपरोधिक सवाल खडसेंनी यावेळी केला आहे.