‘CM शिंदेंच्या नावाने बिल्डरांकडून सेटलमेंट’; अधिवेशनात आव्हाड-देसाईंमध्ये खडाजंगी

‘CM शिंदेंच्या नावाने बिल्डरांकडून सेटलमेंट’; अधिवेशनात आव्हाड-देसाईंमध्ये खडाजंगी

Jitendra Awhad Vs Shambhuraj Desai : विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांंमध्ये खडाजंगी सुरु असल्याचं दिसून येतंय. अशातच आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) भिडल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाने बिल्डरांकडून सेटलमेंट होत असल्याचा आरोप आव्हाडांनी केल्यानंतर देसाईंनी आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Article 370 : …तर मग नेहरुंनी ‘तात्पुरतं’ असा शब्द का वापरला? अमित शाहांनी विरोधकांना फटकारलं

जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी माझ्या भाषणात बोललो आहे की, मला निधी मिळत नसेल तर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दारात उभं राहीन. आम्हाला निधी देऊ नका, पैसे देऊ नका पण लोकप्रतिनिधींचा आदर तर ठेवा,. ठाण्यात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असते. ठाण्यात जोडलेले रस्ते अतिक्रमणित केलेले आहेत. आम्ही बिल्डरांना काही बोललं की म्हणतात मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

‘…तोच न्याय प्रफुल्ल पटेलांना लावणार का?’, मलिकांच्या मुद्यावरून ठाकरेंनी फडणवीसांना घेरलं

तसेच ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या नावाने बिल्डरांकडून सेटलमेंट केली जात असल्याचंही ते म्हणाले आहेत. शंभूराज देसाईंनी हल्लाबोल केल्यानंतर मुख्यमंत्री असले धंदे करीत नाहीत याची आम्हाला खात्री असल्याचं म्हणत त्यांनी सारवासारवही केल्याचं पाहायला मिळालं आहे.

Aalandi Samadhi Sohala : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 727 वा संजीवन समाधी सोहळा; आळंदी नगरी दुमदुमली

शंभूराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या प्रकरणाशी कुठेही संबंध येत नाही, त्यांचं नाव आव्हाडांनी थेट घेतलं आहे. त्यांचं नाव घेऊ नका. रेकॉर्डवरुन काढून टाका. सेटलमेंटचं आव्हाड बोलले आहेत यावर माझी हरकत असून असं बिलकुल चालणार नसल्याचं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात सध्या मराठा आरक्षण, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, बेरोजगारी, महागाई विविध मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून जाहीर करण्यात न आल्याने विरोधकांनी आज सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे. विरोधकांनी कांद्याच्या दरवाढीवरुन सरकारविरोधात विधी मंडळाच्या पायऱ्यांवरच आंदोलन केल्याचं दिसून आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube