Download App

‘दादांचं बंड स्वार्थासाठी’ म्हणणाऱ्या शालिनीताईंना चपराक; चाकणकर म्हणाल्या, ‘नैराश्यपोटीच..,’

Rupali Chakankar On Shalinitai Patil : शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) यांना आलेल्या नैराश्यापोटीच अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर विधाने करीत असल्याची चपराक राष्ट्रवादीच्या नेत्या रुपालीताई चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्यावर शालिनीताई पाटलांनी खोचक टीका केली होती. त्यावर आता रुपालीताई चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सुनील केदार यांचे नाक दाबण्यासाठी भाजपचा डाव : चौफेर कोंडी करण्याचे प्रयत्न

रुपाली चाकणकर म्हणाल्या, इतरांची भविष्यवाणी करणाऱ्या शालिनीताई पाटील मागे त्या एकदा पांडित्य करताना म्हणाल्या होत्या की, नेहरु आणि गांधी जेव्हा तुरुंगवास भोगत होते तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिशांच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे ते ब्रिटीशांना सातत्याने बातम्या पुरवत होते. इतकी त्यांची हुशारी आहे. शालिनीताईंनी यशवंतराव चव्हाण यांच्याविरोधात निवडणूक लढवली. वसंतदादा पाटील यांच्यावरही टीका केली. शरद पवारांसह अजितदादांवरही ते आता टीका करताहेत. शालिनीताईंना आलेल्या नैराश्यापोटी अशी विधाने करीत असल्याची टीका चाकरणकरांनी केली आहे.

राम मंदिराचा मॅप आला समोर! 70 एकरच्या एरियात भक्तांना मिळणार ‘या’ सुविधा; सचिवांनी दिली माहिती

तसेच अजित पवार यांनी भूमिका बदलली आहे, पण अजितदादांनी कधीच विचारसरणी बदललेली नाही. शालिनीताईंनी तर विचार, भूमिका, त्यासोबतच विधानेही बदललेली आहेत. त्यामुळे त्यांच्या अशा विधानांकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

Year Ender: 2023 ‘या’ वर्षात मराठी सेलिब्रिटींचा मोठ्या थाटात पार पडला लग्नसोहळा

काय म्हणाल्या होत्या शालिनीताई पाटील?
शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. शरद पवारांचं बंड हे आपल्या पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत, यासाठी होतं. तर अजित पवराांच बंड हे स्वार्थासठी होतं. उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यासााठी अजित पवारांचं बंड होतं, अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केली होती.

Shirur Loksabha अजितदादांकडे गेल्यास आढळरावही अजितदादांच्या गटात जाणार? म्हणाले चर्चेला अजून…

तसेच 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा येतील. जो माणूस सख्ख्या चुलत्याचा, ज्याने लहानानं मोठं केलं त्यांचा विश्वासघात करतो, त्याच्यचावर विश्वास का ठेवावा? अजित पवारांवर कुणाही विश्वास ठेवणार नाही. अजित पवारांसोबत गेलेली माणसं कोणत्या लायकीची आहेत, हे मी अनेकदा सांगतिलं. त्यात बाकी जे आमदार आहेत, ते पुन्हा शरद पवारांकडे जातील, असंही शालिनीताई पाटील म्हणाल्या आहेत.

follow us