Download App

विरोधी नेते भाजपसोबत का चाललेत? शरद पवारांनी सांगितलं खरं कारण…

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलचं धुमशान सुरु आहे. देशातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून भाजपला धारेवर धऱत टीका-टीपण्या सुरु आहेत. भाजपच्या नेत्यांकडूनही विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य करीत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पुण्यातल्या आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

Narayana Murthy Birthday : एका जिद्दीनं करुन दाखवलं! पत्नीकडून 10 हजार उसणे घेऊन नारायण मूर्तींनी उभारलं इन्फोसिसचं साम्राज्य

देशातल्या विविध राज्यांत विरोधी पक्षाचे नेते भाजपसोबत जात सत्ता स्थापन करत असल्याची परिस्थिती आहे. महाराष्ट्रातही अशीच काहीशी परिस्थिती असल्याने याच मुद्द्यावर शऱद पवारांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार म्हणाले, सध्या काही नेते भाजपसोबत जात आहेत. ईडी चौकशी लागताच काही लोकं भाजपसोबत जात असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

गोविंदांसाठी गुड न्यूज! राज्य सरकारकडून 50 हजार गोविंदांना 10 लाखांचे विमाकवच

तसेच सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम सुरु आहे. सत्तेचा गैरवापर होत असून विरोधी पक्षाच्या नेत्यांमागे ईडी लावल्यानेच ते लोकं भाजपसोबत जात असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही त्यांनी सडेतोडपणे भाष्य केलं आहे.

Sanjay Raut : भाजपमधील 70 टक्के लोक ‘डुप्लिकेट माल’; गडकरींच्या वक्तव्यावरून राऊतांचा टोला

कांद्याच्या निर्यातशुल्कामध्ये केंद्र सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. त्यामुळेच कांद्याचे दर घसरले आहेत. केंद्र सरकारने अनेक निर्णय शेतकऱ्यांच्याविरोधात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

देश स्वतंत्र्य झाल्यानंतर भारत पाकिस्तानची फाळणी झाली होती. या फाळणीमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. हे सरकार फाळणीचा इतिहास शिकवत आहे. देशाला धार्मिक युद्ध नको आहे, फाळणीचा इतिहास शिकवणं योग्य नसून देशातली शांतता भंग करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us