Download App

भाजपला नैतिकता उरली नाही, दिलेला शब्द फिरवणे त्यांची पद्धत…; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

Supriya sule : गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार हे इंडिया आघाडीत नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज ते इंडिया आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पुन्हा एकदा भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. त्यांनी ९ व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली.

मालदीवच्या संसदेत फुल्ल ऑन राडा : सत्ताधारी अन् विरोधी भिडले, एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण 

आज माध्यमांशी बोलतांना सुप्रिया सुळेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. नितीश कुमार यांच्या शपथविधीविषयी विचारलं असता सुळे म्हणाल्या, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असून शेवटी लोकशाही आहे. तसंच मला या घटनेच्या पार्श्वभूमीवर मला अमित शाहांचं एक षणही आठवते. नितीश कुमारांसाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद असं ते म्हणाले होते. आणि आज नितीश कुमार भाजपसोबत आहेत. त्यामुळं दिलेला शब्द फिरवणे ही भाजपची पद्धत बनली आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही काही वर्षांपूर्वी मी लग्न करणार नाही, बॅचलर राहीन, पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. त्यामुळे ही भाजपची मंडळी विरोधी पक्षात असतात. त्यावेळी खूप मोठी विधानं करतात. एखाद्याची बदनामी करतात आणि तो व्यक्ती सोबत गेल्यावर तपास यंत्रणांच्या माध्यमातून पक्ष फोडा, घरफोडा हे एवढं सर्व करून यांची सत्ता कशी येईल यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळं भाजपला कोणाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.

Nitish Kumar : आता आम्ही कायमस्वरुपी.. CM बनल्यानंतर नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने अधिसूचना काढली. त्यावरही सुळेंनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, धनगर, मुस्लिम आणि लिंगायच समाजाचीही आरक्षणाची मागणी आहे. मुस्लिम धनगर समजाला जे सरकार न्याय देईल, त्यांच्या सोबत आम्ही पूर्ण ताकदीने असू. त्यांनी दिलं नाही तर आमचं सरकार आल्यावर आम्ही त्यांना आरक्षण देऊ, असं सुळे म्हणाल्या.

वंचित आणि आम्ही एकत्र लढू- सुळे
वंचितचा अजूनही इंडिया आघाडीत समावेश झाला नाही. त्याविषयी विचारले असता सुळे म्हणाल्या की, वंचित बुहजन आघाडीचं आणि प्रकाश आंबेडकरांचं आंबेडकरांचा महाविकास आघाडीत स्वागतच आहे. अनेकदा आम्ही हे बोललो. वंचित आमच्यासोबत असावी, आम्ही एकत्रित निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा आहे. कारण, देशाचं संविधान धोक्यात आहे. संविधान वाचण्यासाठी आम्ही एकत्र लढणार आहोत, असं सुळे म्हणाल्या.

follow us