Download App

“धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्याची सुपारी भाजप आमदारानं घेतली”, राष्ट्रवादीच्या आमदाराचा गंभीर आरोप

भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग प्रकरणात धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे.

Amol Mitakri allegations on Suresh Dhas : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच यांच्या हत्येनं राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. या खूनातील मारेकरी अद्याप मोकाटच आहेत. हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारवर हल्लाबोल केला होता. भाजप आमदार सुरेश धसही धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत आहेत. यामुळे महायुतीत खटके उडू लागले आहेत. आताही अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीत धुसफूस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. अमोल मिटकरी यांनी कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख न करता सुरेश धस यांच्यावर हा आरोप केला आहे. परंतु, मस्साजोग प्रकरणातच त्यांनी हे वक्तव्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

अजितदादा बीडचं पालकत्व घ्या म्हणजे अंधारात.., बजरंग सोनवणेंनी काय सांगितलं?

मिटकरी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक छोटी पोस्ट लिहिली आहेत. यात त्यांनी आमदार सुरेश धस यांचं नाव घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर एका सामाजिक कार्यकर्त्यालाही कामाला लावण्यात आलं आहे असे म्हटले आहे. या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव त्यांनी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख अंजली दमानिया यांच्याकडे आहे. कारण या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

केवळ पंकजाताई व धनंजयजी मुंडे दोघे बहीण भाऊ एकत्र आल्याने महायुतीचे व विरोधातील आमदार एकत्र येऊन आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक धनंजयजी मुंडे यांच्या राजकीय कारकि‍र्दीला संपवण्याचं पद्धतशीर काम करत आहेत. त्यासाठी एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्या आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

धक्कादायक! तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती; पेट्रोल टाकून सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

शनिवारी मूक मोर्चाचे आयोजन

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या (Sarpanch Santosh Deshmukh Murder) हत्येमुळे संतापाचं वातावरण आहे. या हत्या प्रकरणाला 18 दिवस झालेत. परंतु अजून देखील याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. केवळ गंभीर आरोप होत असल्याचं दिसतंय. त्यामुळे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या 28 डिसेंबर रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

follow us