Eknath Khadse on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी आज गजानन मारणे (Gajanan Marane) याची भेट घेतली आहे. पार्थ पवार आणि गजानन मारणे यांच्या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. गजा मारणे आणि पार्थ पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गजानन मारणे आणि पार्थ पवार यांचा भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या बैठकीचे नेमके कारण काय, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. दरम्यान, यावर आता शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाष्य केलं.
महाविकास आघाडीचे निमंत्रणही येऊन प्रकाश आंबेडकर प्रचंड चिडले! थेट पत्र काढत नवी अट घातली
गजानन मारणे आणि पार्थ पवार यांची आज भेट झाली. मारणे यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीत्याला अनेकदा अटक करण्यात आली आहे. पुण्यातील टोळीयुद्ध आणि गजानन मारणे गॅंग नेहमीच चर्चेत असते. असं असतांना पार्थ पवार हे मारणेला भेटल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. यावर बोलतांना एकनाथ खडसे यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली. खडसे म्हणाले, अजित पवारांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलणं हाच मोठा विनोद आहे. अजित पवार जर कायदा-सुव्यवस्था चांगली आहे, असं म्हणत असतात. आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे गजानन मारणेची भेट घेतात. गजानन मारणेवर पुण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळं अशा गुन्हेगारांना भेटणं योग्य नाही. किमान अजित पवारांनी आपल्या मुलाला तरी समजावलं पाहिजे, असा टोला खडसेंनी लगावला.
महाविकास आघाडीचे निमंत्रणही येऊन प्रकाश आंबेडकर प्रचंड चिडले! थेट पत्र काढत नवी अट घातली
तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार कायदा व सुव्यवस्थेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे काम करतात. गजानन मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत. गजानन मारणेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे पार्थ पवार एखाद्या गुंडाला भेटले असं म्हणणं चुकीचं आहे.आमचे विरोधक जाणूनबुजून अशा चुकीच्या बातम्या पसरवत आहेत, असं पाटील म्हणाल्या.