शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी होणार 270 कोटींचा धूर : शिंदे सरकार विरोधकांच्या रडारवर

'विशेष प्रसिद्धी मोहीम नाही तर 'निवडणुकीची प्रसिद्धी मोहिमच' असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सरकारच्या मनातलं सांगितलंय. सरकारकडून योजनांच्या प्रसिद्धीसाठी 270 कोटी रुपयांची तरदूत करण्यात आलीयं. या निर्णयावरुन जयंत पाटलांनी सरकारचा निषेध केलायं.

Untitled Design (31)

Untitled Design (31)

Jayant Patil : राज्य सरकारच्या विविध योजनांच्या प्रसिद्धीसाठी सरकारकडून 270 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीयं. सरकारच्या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारकडून पुढील दोन महिन्यात 270 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारला चांगलंच धारेवर सरकारच्या मनातलंच सांगून टाकलंय. ही विशेष प्रसिद्धी मोहिम नाही तर निवडणुकीची प्रसिद्धी मोहिम असल्याची सडकून टीका जयंत पाटलांनी केलीयं. तसेच या सरकारच्या या निर्णयाचा जयंत पाटलांनी निषेधही केलायं. यासंदर्भातील पोस्ट पाटील यांनी एक्सवर केलीयं.

जयंत पाटील म्हणाले, राज्य सरकाकडून सर्व योजनांच्या प्रसिद्धीसाठी 270 रुपयांची तरतूद करण्यात आलीयं. आधीच राज्य सरकारवर 8 लाख कोटी रुपयांचं कर्ज असून त्यात आता सरकारच्या तिजोरीतून 270 कोटी रुपये पुढील दोन महिन्यांत खर्च करण्यात येणार आहेत. ही शासकीय योजनांची विशेष प्रसिद्धी नाही तर निवडणुकीची प्रसिद्धी मोहिम असल्याचं म्हटंल तरीही वावगं ठरणार नाही, या शब्दांत जयंत पाटलांनी सरकारवर टीका केलीयं.

‘इतकी वर्ष नेतृत्व करेल असं वाटलं नव्हत’ भारताचा स्टार टेनिस खेळाडू रोहन बोपन्नाची निवृत्तीची घोषणा

तसेच निवडणुकांच्या निकालाचा अंदाज आल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली आहे. म्हणूनच हा खटाटोप केला जात आहे. सत्ताधारी स्वतःची जितकी प्रसिद्धी करतील तितका सामान्य जनतेच्या मनात त्यांच्याबद्दलचा राग वाढत जाईल. तिजोरीच्या पैशांमधून सरकार जेवढी प्रसिद्धी करेल तेवढा जनतेच्या मनात राग वाढत जाईल असा विश्वास मला असल्याचंही जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय.

भाजपने जनतेला अभिमन्यूसारख चक्रव्यूहात अडकवलं, मोदी-शाह-अदानींचं नाव घेत राहुल गांधींचे टीकास्त्र

सध्या राज्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झालीयं, एसटी महामंडळाच्या बसेस, शेतकऱ्यांचे प्रश्न, पीएचडीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन असे प्रश्न समोर असताना सरकारकडून हा नाहक खर्च केला जात आहे. एवढे पैसे सरकार प्रसिद्धीसाठी वापरणार आहे. आता पेपर वाचण्याची गरजच नाही . सगळीकडे यांचेच फोटो दिसणार आहेत. टिव्हीसह इतर ठिकाणी एवढे पैसे खर्च करण्याची सरकारची तयारी आहे हा खर्च महाराष्ट्राच्या जनतेसाठी नाही तर सत्ताधारी पुनर्वसनासाठीचि एवढा खर्च करत असून याचा जाहीर निषेध करत असल्याचंही जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय.

Exit mobile version