Download App

Maratha Reservation : दोन वर्ष नाही विचारलं आता का विचारता? आव्हाडांचा खोचक सवाल

मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने मागील दोन वर्ष नाही विचारलं आता का विचारता? असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलायं.

Jitendra Awhad : मागील दोन वर्षांपासून सरकारने विरोधकांना विचारलं नाही आता का विचारता? असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnvis) सरकारला केलायं. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीवरुन जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे सरकारला चांगलच धारेवर धरलंय.

मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स लोगोचे अनावरण, आदित्य ठाकरेंची उपस्थिती अन् मोठी घोषणा

आव्हाड म्हणाले, मागील दोन वर्षांपासून सरकार मराठा आणि ओबीसी समाजासोबत खेळत आहे. जेव्हा सरकार दोन्ही समाजाशी खेळत होतं, त्यावेळी विरोधक आठवले नाहीत. तेव्हा आम्ही भाषणात सांगतो होतो की तुम्ही दोन समाजाशी खेळत आहात. महाराष्ट्राचा समाजव्यवस्थेत कधीही पडदा फाटला नाही. शिवरायांसोबत सर्वच समाजाचे लोकं होते. सामाजिक स्वास्थ्याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराज आहेत. तुम्हाला मराठा अन् ओबीसींना भडकावयंच होतं. आता काहीच होत नाही त्यामुळे विरोधकांना बोलवत असल्याची टीका आव्हाडांनी केलीयं.

दिग्गजांची नावे घेत अजितदादांसाठी उमेश पाटील विरोधकांना भिडले; भाजपलाही दिली आठवण

तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील अनेक दिवसांपासून राज्यात तापलेला आहे. तुम्ही दोन्ही समाजाच्या भावनांशी खेळत आहात. तुमच्याकडून काहीत होत नाही म्हणून आता विरोधक आठवत आहेत. मुंबईतील वाशीमध्ये जेव्हा तुम्ही गुलाल उधळला तेव्हा विरोधकांना विचारुन गुलाल उधळला का? आता तुमचा निर्णय आहे तुम्ही घ्या, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

विधानसभा निवडणुकीपासून लांब राहणार नाही, कॉंग्रेसचा विचार…; सत्यजित तांबेंचं मोठं विधान

मागील अनेक वर्षांपासून आरक्षणाबद्दलच्या कोणत्याही निर्णयात सरकारने विरोधकांना विश्वासात घेतलं का आता का विचारत आहात. तुम्ही स्वत:ला तर बुद्धीमान समजत होता ना…आम्ही हा आयोग नेमला आहे तो नेमला, तुमच्याकडे 206 आमदार आहेत तुमचा निर्णय तुम्हीच घ्या, असं जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलंय.

पुरावाच नसेल तर काय होणार...
वरळीतील हिट अॅंड रन प्रकरणी आरोपी 60 तासांच्या नंतर पोलिसांच्या हाती लागतो. मागील साठ तासांत आरोपीने अनेक तपासण्या केल्या असतील. त्या टेस्टमध्ये दोन ते तीनवेळी रक्तात मद्य किंवा ड्रग्जचे नमुने आढळून नाहीत म्हणूनच आरोपी पोलिसांना भेटला आहे. आता कोणताही पुरावा नसेल तर काय होणार आहे, त्याने जर गाडी थांबवली असते तर महिलेचा जीव वाचला असता, या शब्दांत आव्हाडांनी वरळी हिट अॅंड रन प्रकरणी ताशेरे ओढले आहेत.

follow us