Nilesh Lanke On Sujay Vikhe : मला लोकसभा लढवायची नव्हती, पण समोरच्याची जिरवली, असा खोचक टोला खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांना लगावलायं. दरम्यान, अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत निलेश लंके विरुद्ध सुजय विखे असा सामना पाहायला मिळाला. यादरम्यान, लंके आणि विखेंमध्ये जोरदार शाब्दिक चकमकही दिसून आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा निलेश लंके यांनी सुजय विखे यांना टोला लगावलायं. ते जवळे येथे विविध विकासकामांच्या भूमिपुजनादरम्यान बोलत होते.
दुलीप ट्रॉफी 2024 साठी संघाची घोषित, श्रेयस अय्यर, शुभमन गिलसह ‘या’ स्टार खेळाडूकडे मोठी जबाबदारी
निलेश लंके म्हणाले, मला लोकसभेची निवडणूक लढवायचीच नव्हती, ही निवडणूक खेटाखेटीत झाली. मला कोणी खेटलं तर जमत नाही हे जगाला माहिती आहे. विधानसभेत मी आनंदी होतो. असे सांगतानाच लोकसभेची जबाबदारी आल्यावर आपण काम करून दाखविणार असून पाच वर्षात निष्क्रिय नव्हे तर राज्यात कामाचा ठसा उमटविणार आहोत, असा विश्वास खा नीलेश लंके यांनी व्यक्त केला.
तसेच माझ्या विजयानंतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर निघोजमधील एकाने माझी खासदारकी जाणार अशी पोष्ट केली. मात्र मी समोरच्याची जिरवली ना? न्यायालयात जरी काही झाले आणि निवडणूक झाली तरी पुन्हा दोन-तीन लाखांनी पराभव करेल, असा टोला लंके यांनी लगावला.
BMC मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार 60 हजार रुपये पगार
न्यायालयाचा काय निकाल लागणार आहे? असा सवाल करीत ‘मी अनुभवलेला कोविड’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते निवडणूकीपूर्वी एक महिना करण्यात आले. ती पुस्तके पन्नास रूपये देऊन गोळा करण्यात आली. मला जनतेने काम करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यांना कोर्ट कचेरीसाठी वेळ दिला आहे. त्यांना पराभव मान्य नाही, अशी घणाघाती टीका लंके यांनी केली.
लोकांच्या नावावर जमीनी करून देण्याचा मंत्र्यांना अधिकार आहे का?
पठारवाडीतील गायरान हडपण्याचा काही लोकांचा डाव असून त्यामागे कोण आहे? त्याला आशिर्वाद कोणाचा आहे? हे सर्वांना माहिती आहे. या प्रश्नावर पठारवाडीकरांनी एकसंघ रहावे. मी तुमच्या पाठीशी आहे. गावाच्या जमीनी कोणी बळकावत असेल तर त्यास विरोध करणे हे आमचे काम आहे. मग बळकावणारा कोणत्याही विचारांचा असो. सत्तेचा गैरवापर करायचा नसतो. याच प्रश्नावरून पठारवाडीच्या ग्रामस्थांना दमदाटी केली जाते. या प्रश्नावर संपूर्ण ताकद देण्याची माझी तयारी आहे. कोणी अधिकारी ऐकत नसेल तर आपण त्यांच्या दारात जाऊन बसू. लोकांच्या नावावर जमीनी करून देण्याचा मंत्र्यांना अधिकार आहे काय? असा सवाल लंके यांनी केला.
त्यांनी पारनेरची काळजी करू नये
विरोधकांनी माझ्या पारनेर-नगर मतदारसंघाची काळजी करू नये. त्यांनी बुक्का तयार ठेवावा. खासदारकी जिंकली आता तुम्ही असल्यावर काय काळजी आहे. लोकसभेला तालुक्यातील निम्मी यंत्रणा बाहेरच्या तालुक्यात होती. तरीही गावागावांमध्ये आपल्याला आघाडी आहे. ती यंत्रणा आता इथेच आहे. पारनेरचा विषय सोडून द्या, आपल्याला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे. जिल्हयातून सर्व आमदार निवडून आणण्याचा शब्द शरद पवार, उध्दव ठाकरे यांना दिला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना महाविकास आघाडीचे घटक आहेत. उमेदवारी ठरविण्यासाठी आघाडीचे नेतृत्व सक्षम आहे. त्यांचा जो निर्णय होईल त्याला आपण सहमत राहू, असे लंके यांनी स्पष्ट केलंय.