Download App

मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री अन् आता त्याचाही हाफ वन; सुळेंनी फडणवीसांना डिवचलं

Supriya Sule On Devendra Fadnvis : फडणवीस मुख्यमंत्रिचा उपमुख्यमंत्री अन् आता त्याचाही हाप वन झाल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांना पुन्हा डिवचलं आहे. दरम्यान, कंत्राटी जीआरच्या मुद्द्यावरुन भाजप-राष्ट्रवादीत चांगलीच खडाजंगी सुरु आहे. त्यावरुन आता सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना सुनावल्याचं पाहायला मिळालं आहे.

‘देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी’; कंत्राटी भरतीच्या जीआरवरुन सुळे-फडणवीसांची जुगलबंदी

सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस सध्या संभ्रमात आहेत. त्यांचं डिमोशन झाल्याने मला त्याचं खूप वाईट वाटतयं. मुख्यमंत्रिचा उपमुख्यमंत्री झाला आता त्याचाही हाप वन अॅण्ड टू आहे. देवेंद्रजी वन उपमुख्यमंत्री आहेत असं त्यांचे जॅकेटवाले फोटोग्राफर सांगत असून डीसीएम 1 असं जॅकेटवर लिहुन त्यांनी नवीनच काहीतरी सुरु केलं, असल्याची टीकाही सुळे यांनी केली आहे.

Sonali Kulkarni : अप्सरा सोनालीच्या मादक अदांवर चाहते फिदा

आता जो माणूस सीएम होता तो डीसीएम 1 झाला आहे हे नवीनच महाराष्ट्रात सुरु झालवं आहे. त्यांच्याबद्दल मला प्रचंड आस्था, आदर, प्रेम आणि अस्वस्थता आहे त्यांच्यावर अन्याय झाला असल्याचंही सुळे म्हणाल्या आहेत.

Contract Recruitment चा निर्णय ‘हे’ मविआचे पाप…महाभकास आघाडीचा निषेध; म्हणत भाजप आक्रमक

राज्यात सध्या कंत्राटी भरतीच्या जीआरवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलचं रान पेटलं आहे. विरोधकांसह परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी या भरतीच्या जीआर विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने अखेर राज्य सरकारने हा जीआर मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच शुक्रवारी कंत्राटी भरतीचा जीआर मागे घेत असल्याचं जाहीर केलं. त्यावेळी हा जीआर 2011 सालीच काढण्यात आल्याचं खापर विरोधकांवर फोडलं होतं. त्यानंतर विरोधक आणि भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु झालं आहे.

शाई फेक झाली की शर्ट बदलतो अन् तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो : चंद्रकांतदादा पाटील

कंत्राटी नोकर भरतीचं पाप महाविकास आघाडीचं आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी. त्यांनी माफी मागितली नाही तर आमच्या पक्षाकडून त्यांना उघडं करू, या शब्दांत फडणवीसांनी टीका केली होती. त्यावरुनही सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. सुळे म्हणाल्या, कंत्राटी भरतीचा जीआर 2011 साली निघाला तेव्हा शरद पवार किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते. त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळी सरकारच्या कॅबिनेटमध्ये नारायण राणे, अजित पवार, हसन मुश्रीफ ही सगळी मंडळी होती. फडणवीस जे आरोप करीत आहेत, त्यावर वाटलं होतं की करारा जवाब मिलेगा पण सगळी चुकीची माहिती त्यांनी दिली असल्याचं प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.

Tags

follow us