Supriya Sule On Womens Reservation Bill : महिला आरक्षण विधेयावरुन देशभरातील राजकारण चांगलच तापलेलं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने महिला आरक्षणाचं विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडलं. आज या विधेयकावर लोकसभेमध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांनी आपली भूमिका मांडली. महिला आरक्षण विधेयक हे राजीव गांधी (Rajiv Gandhi)यांचं स्वप्न होतं. त्यामुळे सरकारने हे लवकर पूर्ण करावं असेही त्या म्हणाल्या. त्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाल्या की माझ्यासारख्या महिलांना आरक्षण नको तर ज्या महिलांना संधी मिळत नाही अशा महिलांनी त्याचा फायदा घ्यावा असेही त्या म्हणाल्या.
पहिले हे बदला! 90 सचिवांमध्ये केवळ 3 OBC; लिस्ट दाखवत राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं
सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, मी ज्यावेळी पहिल्यांदा संसदेत निवडून आले तेव्हाचा क्षण आजही आठवतो. आज मला दोन महिला खासदार आठवतात. त्यांना यावेळी वृंदा करात आणि सुषमा स्वराज यांची आठवण झाली. या विधेयकाचा महिलांना फायदा होईल की नाही माहित नाही मात्र हा सरकारचा जुमला आहे. हे बिल आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणलं आहे.
सुळे म्हणाल्या की, माझ्यासारख्या महिलांनी या महिला आरक्षणाचा फायदा घेऊ नये. हे आरक्षण ज्या महिलांना संधी मिळत नाही, त्यांनी घेतला पाहिजे. आमच्यासारख्या महिलांनी हेच आरक्षण नाही तर ते मराठा आरक्षण असेल, ओबीसी, धनगर, मुस्लीम असेल असं कोणतंही आरक्षण घेऊ नये.
ज्यांना आरक्षणाची खरच गरज आहे, त्यांना त्याचा फायदा होईल. आम्हाला शिक्षण मिळालं, आमच्या कुटुंबानं आम्हाला स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यामुळे आम्ही आरक्षण घ्यायलाच नको, असेही सुप्रिया सुळे(Supriya Sule) म्हणाल्या.
त्याचबरोबर महिला आरक्षणामुळे महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कुठलेही जबाबदारीचे पद हे कर्तृत्वावर असावं. ते महिला किंवा पुरुष अशा निकषांवर नसावं. त्याच्यामुळे महाराष्ट्राची मुख्यमंत्री ती व्यक्ती व्हावी, जी कर्तृत्वाने महाराष्ट्राला एक नंबरला नेईल आणि पुरोगामी विचार जपेल. त्यामुळे महिला किंवा पुरुष याच्यामध्ये जास्त न अडकता कर्तृ्त्वाला आपण जास्त महत्व द्यावं असंही यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.