गतिमान कसलं, हे तर गतिमंद सरकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत मंत्र्यांना टक्केवारी; प्राजक्त तनपुरेंचा हल्लाबोल
Prajakt Tanpure On Shinde Fadnavis Ajit Pawar Sarkar : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यातील विविध विकास कामांवरुन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. जिल्ह्यातील विकास कामांच्या गतिवरुन हे सरकार गतिमान नाही तर गतिमंद सरकार आहे. अनेक कामं ठप्प आहेत, निविदा प्रक्रिया उशीराने राबवली जाते. काही ठराविक ठेकेदारांनाच कामं देण्याचा प्रयत्न केला जातो.
त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची टेंडर प्रक्रिया उशीरा केली जाते. काम सुरु करण्याचे आदेशही दिले जात नाहीत. मंत्र्यांना टक्केवारी मिळण्याची वाट पाहिली जाते का? असा गंभीर आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे.
Turkey : ‘काश्मीरचा प्रश्न सोडवा’; तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचं संयुक्त राष्ट्रात मोठं विधान…
अहमदनगर जिल्ह्याची प्रभारी जबाबदारी मिळाल्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. राज्यात दुष्काळसदृश्य स्थिती असताना सरकार जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे.
Women’s Reservation : ‘प्रत्येक घरात असे भाऊ नसतात’; सुप्रिया सुळेंचा रोख कोणाकडे?
तनपुरे म्हणाले की, सरकार दुष्काळ जाहीर करण्यापेक्षा प्रसिद्धीसाठी अवाढव्य खर्च करत आहे. एकप्रकारे सरकारकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जात असल्याचा गंभीर आरोपही केला. त्यामुळे राज्यातील सरकार हे गतिमान नसून ते गतिमंद सरकार असल्याचा टोला माजी मंत्री तनपुरे यांनी लगावला.
जिल्ह्यात 90 टक्के मंडळांमधील पिकांचं नुकसान झालं असतानाही ई-पीक पाहणीची अट घातली आहे. तांत्रिक अडचणी असल्याने फक्त 25 टक्के भागाचीच ई-पीक पाहणी झाली आहे. त्यावर एक रुपयात पीक वीमा हा फक्त सरकाकडून दिखावाच करण्यात आला का? ही अट शिथील करावी, तलाठ्याने केलेल्या नोंदी ग्राह्य धरण्याची मागणी देखील माजी मंत्री तनपुरे यांनी केली.
सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाबद्दल तनपुरे म्हणाले की, लोकांच्या घरी जाऊन त्यांना दाखले देणे गरजेचे होते, पण तसे काही झाले नाही. अनेक योजना सध्या प्रलंबित आहेत. विविध योजनांचे निधी सरकारला देता येत नाहीत, कांद्याचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. शेतकऱ्याला फक्त दहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. बहुतेक शेतकऱ्यांना तेही मिळत नाही असा आरोपही माजी मंत्री तनपुरे यांनी सरकारवर केला आहे.