राष्ट्रवादी सरदारांची फौज, रोहित पवारांनी पक्षाची संस्कृती समजून घ्यावी; बावनकुळेंचा हल्लाबोल
Chandrasekhar Bawankule on Rohit Pawar : काँग्रेसमध्ये आताही घराणेशाहीच सुरु आहे. राष्ट्रवादी पक्ष सरदारांची फौज आहे. शरद पवार यांनी कुटुंबाशिवाय बाहेरच्या लोकांना मोठे होऊ दिले नाही. मात्र भाजपने देशाला मोठे नेतृत्व दिल्यामुळे आमच्या पक्षात कार्यकर्ता मोठा होऊ शकतो. त्यामुळे रोहित पवारांनी (Rohit Pawar) भाजपवर बोलण्याआधी आपल्या पक्षाची परंपरा आणि संस्कृतीचा इतिहास जाणून घ्यावा, असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केला.
धनगर समाजाचे विविध आंदोलने सुरू असून,त्यांच्या समस्या घेऊन प्रदेश चिटणीस नवनाथ पडळकर व राम वडकुते माझ्याकडे आले होते. धनगर समाजाच्या मागण्या व समस्या सरकारकडे पाठविल्या. तेवढाच त्या पत्राचा अर्थ असून त्यापेक्षा अधिक नाही, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. कुणीतरी या पत्राचा वापर करून वातावरण खराब करीत आहेत, असाही आरोप त्यांनी केला.
ते नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधत होते.बावनकुळे यांनी दिलेल्या पत्राला सोशल मीडियावर प्रसारित करून त्याचा अपप्रचार सुरू असल्याच्या प्रकार चुकीचा आहे, असे मत व्यक्त करून ते म्हणाले की, महिला आरक्षण विधेयकामुळे कॉंग्रेस पक्ष बॅकफूटवर गेला आहे. त्यामुळे त्यांचे नेते काहीतरी बोलत सुटले आहेत. राज्यातील कॉंग्रेस नेत्यांमध्ये एकमेकांपेक्षा अधिक जलद कोण बोलू शकतो याविषयीच स्पर्धा लागली आहे. सुरुवातील कोण बोलते हे त्यांना कॉंग्रेसच्या दिल्ली दरबारी दाखवायचे आहे.
Women’s Reservation : ‘प्रत्येक घरात असे भाऊ नसतात’; सुप्रिया सुळेंचा रोख कोणाकडे?
कमलनाथ यांचा मराठी मतदारांवर डोळा
मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे नेते कमलनाथ यांचा मराठी मतदारांवर डोळा असून पंढुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून त्याचे अनावरण आदित्य ठाकरेंच्या हस्ते करून ते केविलवाना प्रयत्न करीत आहेत. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्याच लोकसभा मतदारसंघातील सौंसर येथील शिवाजी महाराजांचा पुतळा का पाडला यावर उत्तर द्यावे, असा प्रश्न केला.
Women reservation : लढली अन् जिंकली, प्रमिला दंडवतेंनी सुरु केलेला लढा 27 वर्षांनी पूर्ण
डीपीसीचा निधी विरोधकांना दिला नाही
उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीचा निधी विरोधी पक्षातील आमदार व लोकप्रतिनिधींना मिळू नये असा अलिखित आदेश काढला होता. त्यांनी आकसापोटी राजकारण केले. आता ते लोक निधीवाटपावर बोलत आहेत त्यांनी स्वत:कडे बघावे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्री आहेत, त्यांनी डीपीसीमधून एक हजार कोटींचा निधी दिला आहे. या विकासनिधीचा योग्य वापर व्हावा, विविध योजना राबविल्या जाव्या, अशी आमची भूमिका आहे.