‘ठाण्याचा पठ्ठ्या’ अजितदादांच्या निशाण्यावर; संघटनेचं वाटोळ करणार…

NCP Political Crisis :  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या आजच्या भाषणामध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी काही लोक असे बरोबर घेतलेत की ते संघनेच वाटोळ करतील. उदाहरण द्यायचं झालं तर ठाण्याचा पठ्ठ्या, असे म्हणत आव्हाडांवर फैलावर घेतले. गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड हे अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांवर हल्लाबोल करत आहे. त्यावर अजितदादांनी निशाणा […]

Letsupp Image   2023 07 05T182305.698

Letsupp Image 2023 07 05T182305.698

NCP Political Crisis :  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या आजच्या भाषणामध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी काही लोक असे बरोबर घेतलेत की ते संघनेच वाटोळ करतील. उदाहरण द्यायचं झालं तर ठाण्याचा पठ्ठ्या, असे म्हणत आव्हाडांवर फैलावर घेतले. गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड हे अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांवर हल्लाबोल करत आहे. त्यावर अजितदादांनी निशाणा साधला. ( Ajit Pawar attack On Jitendra Awhad )

अजितदादा म्हणाले की,  “त्यांच्यामुळं गणेश नाईक, संदीप नाईक, सुभाष भोईर, निरंजन डावखरे आदी नेते पक्ष सोडून गेले. वसंतराव डावखरे वयस्कर असताना मला म्हणायचे साहेब का याला मोठं करतात. अनेकजण मला भेटतात. खुप लोक यांच्यामुळे पक्ष सोडून गेले”.

वय झालं तरी थांबायला तयार नाहीत; अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

तसेच आपल्या जीवाभावाचे नेते असलेच पाहिजे, पण त्यांनी बेरजेचे राजकारण केले पाहिजे. एक-एक मंत्र्याने चार-चार आमदार निवडून आणले पाहिजे. बाकीच आम्ही बघतो. परंतु तिथं तर आपले आमदार घालवणाऱ्याला नेता केलं आहे. तसेच काही काही प्रवक्तेदेखील चांगल्याचं बोलून वाटोळ करणारे आहेत, असे म्हणत अजितदादांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला.

जयंत पाटीलही आक्रमक मोडमध्ये, काढली अजितदादांची लाज

यावेळी अजितदादांनी शरद पवारांवर देखील जोरदार तोंडसुख घेतले.  प्रत्येकाचं एक वय असतं. आयुष्यभर काम केल्यानंतर एका टप्यावर थांबायला हवं. मग तो शेतकरी असो, सरकारी अधिकारी असो, उद्योगपती असो की राजकारणी… थांबण महत्वाचं आहे. अडवानी- जोशी निवृत्तही झाले. पण, आमचे वरिष्ठ नेते हे थांबायलाच तयार नाहीत. ते खूप हट्टी आहेत. पण हे नेमकं कशासाठी आहे? मी सुप्रियाला सांगितले की तू साहेबांशी बोल, त्यांना समजावून सांग.. पण नाही, त्यांना थांबायचंच नाही. तरुण नेतृत्वाला त्यांना आशीर्वाद द्यायला काय हरकत आहे? मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? असा सवाल त्यांनी केला.

Exit mobile version