Download App

तासगावचा पुढचा आमदार ठरला! आर.आर. पाटलांच्या लेकानं गाजवलं शरद पवारांचं व्यासपीठ

NCP Political Crisis :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी (ता. 2) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या गटात कोण व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात कोण याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. अजित पवार यांची MET इन्स्टिट्यूट येथे बैठक होत असून शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बैठक होत आहे. यावेळी महाराष्ट्राचे दिवंगत नेते माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची सुपूत्र रोहित पाटील यांनी सभागृह जोरदार भाषण करत सभागृह गाजवलं आहे. अनेकांनी त्यांच्या भाषणामध्ये आर. आर. आबांची झलक पहायला मिळाली, असे बोलले आहे. ( Rohit Patil Join Shard Pawar Camp )

रोहित पाटील म्हणाले की,  “गेल्या 23-24 वर्षामध्ये अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले गेले. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची धोरणं आखली गेली ज्याचा महाराष्ट्राच्या जनतेला फायदा झाला. इथल्या माता-भगिनींना आरक्षण देण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला. जैन समजाला अल्पसंख्याक दर्जा असले, मुस्लीम समाजाला आरक्षण असेल, मराठवाडा विद्यापीठाचा नामंतराचा निर्णय हे सर्व निर्णय शरद पवारांनी घेतले”.

आमचा बाप काढणारेच उरले एक फुल दो हाफ! सामनाला उत्तर अन् शेलारांचा ठाकरेंना टोला

रोहित पाटील पुढे म्हणाले की,  “स्वर्गीय आबा हे फार तर जिल्हा परिषदेपर्यंत मजल मारु शकणारं नेतृत्व होतं. पवार साहेबांनी त्यांना विधानसभेची संधी दिली. आबांनी विरोधी पक्षनेता म्हणून महाराष्ट्रात काम केलं. 1999 साली त्यांनी शरद पवार साहेबांसोबत राहण्याची भुमिका घेतली. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घरातल्या मुलाला महाराष्ट्रच्या गृहमंत्रीपदी आणि उपमुख्यमंत्रीपदी बसवणयाची दानत फक्त पवार साहेबांमध्ये होती”.

मनातील मुख्यमंत्री ‘अजितदादा’ म्हणणारे देवेंद्र भुयारही फिरले… शरद पवारांना अपक्ष आमदारांचे पाठबळ

तसेच आबांचे विचार पुढे घेऊन जात असताना आम्ही शरद पवार साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आज इथं सांगली जिल्ह्यातील व कवठेमहांकाळ मतदारसंघातील सर्व पदाधिकारी इथे आले आहे. या सर्वांसमोर मी साहेबांना वचन देऊ इच्छितो की, तरुण म्हणून वेळप्रसंगी महाराष्ट्र पिंजून काढण्याची वेळ आली तर पिंजून काढू. महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात आम्ही पोहचू. सर्वसामान्य लोकांची अडचण आम्ही समजून घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला नेऊन दाखवू. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाची सत्ता महाराष्ट्रात आणू अशी शपथ घेऊया, असे रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, रोहित पाटील यांच्या भाषणाने 2024 साली तासगाव मतदारसंघातील विधानसभेचा उमेदवार ठरल्याचे बोलले जात आहे. रोहित पाटील हे तासगावमधून 2024 सालचे उमेदवार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. सध्या या जागेवर आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या आमदार आहेत. सध्या त्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags

follow us