आमचा बाप काढणारेच उरले एक फुल दो हाफ! सामनाला उत्तर अन् शेलारांचा ठाकरेंना टोला

आमचा बाप काढणारेच उरले एक फुल दो हाफ! सामनाला उत्तर अन् शेलारांचा ठाकरेंना टोला

Ashish Shelar on Udhav Thackery : राज्याच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यातील सर्वच पक्षातील नेते त्यावरून एकमेकांवर टीका टीपण्णी करत आहेत. त्यामध्ये आजच्या सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नव्याने सत्तेत सामील होत उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांवर निशाणा साधण्यात आला. त्याला प्रतिउत्तर देताना भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील संजय राऊतांसह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. ( Ashish Shelar criticize Udhav Thackery for Samana Articles criticism )

राष्ट्रवादीत वादंग! फोटोच्या मुद्द्यावरुन अमोल मिटकरी थेट आव्हाडांनाच खेटले…

काय म्हणाले आशिष शेलार?

सामना अग्रलेखामध्ये ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नव्याने सत्तेत सामील होत उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना ‘एक (डाऊट) फुल, दोन हाफ’ असं म्हणत टीका करण्यात आली होती. त्यावर आशिष शेलार म्हणाले की, अहंकारी राजा आणि विलासी पुत्र एक विश्वविख्यात दरबारात… नॅनोत मावेल एवढेच उरले पदरात! असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना अहंकारी राजा आणि विलासी पुत्र असं म्हटलं आहे. तर शिंदे गट ठाकरेंना सोडून गेल्याने त्यांच्याकडे आता नॅनो या गाडीमध्ये ज्या प्रमाणे अत्यंत कमी लोक बसू शकतात. तेवढेच ठाकरेंच्या बाजूनने राहिले आहेत. असं शेलार म्हणाले आहेत.

पुढे शेलार असं देखील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नव्याने सत्तेत सामील होत उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना ‘एक (डाऊट) फुल, दोन हाफ’ असं म्हणता त्यापेक्षा ज्यांनी काढला आमचा बाप, तेच उरले आज, एक फुल दो हाफ! असं त्यांनी ट्विट करत आजच्या सामाना अग्रलेखाला उत्तर दिले आहे.

‘शिंदेंची मानसिक स्थिती बिघडली, ‘वर्षा’ बंगल्यातील शस्त्रे जप्त करा’; सामनातून फडणवीसांना सल्ला

सामनातून करण्यात आलेली टीका :

राज्याच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सगळ्यामागचे खरे सूत्रधार दिल्लीत आहेत. जे मिंध्यांच्या बाबतीत घडले तेच नव्या फुटीर गटाबाबत घडत आहे. ‘एक (डाऊट) फुल, दोन हाफ’ हा नवा चित्रपट राज्यात लागला आहे. पण लोकांचा त्यावर बहिष्कार आहे!

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube