Download App

NCP Political Crisis : आव्हाडांनी ‘तो’ नेताच कॅमेऱ्यासमोर आणला; अजित पवार गट आता अडकणार?

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar VS Sharad Pawar नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कुणाची यावर निवडणूक आयोगात आज सुनावणी पार पडली. पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सुनावणीत शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर (Ajit PawarAjit Pawar : दिवाळी संपताच अजितदादांची खलबत; निधी वाटपावरून आमदारांची नाराजी दूर होणार?) मोठा आरोप करण्यात आला आहे. अजित पवार गटाने केवळ कार्यकर्तेच नाही तर पदाधिकाऱ्यांचे खोटे प्रतिज्ञापत्र तयार केला असल्याचा आरोप शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. सुनावणीनंतर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी खोटे प्रतिज्ञापत्र तयार केलेले नेताच माध्यमांसमोर आणला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस कुवर प्रताप चौधरी हे शरद पवार गटाबरोबर आहेत. परंतु त्याचे खोटे प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाने तयार केलेले असल्याचा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वकिलांना केला आहे. विशेष म्हणजे प्रताप चौधरी हे सुनावणीच्या वेळी शरद पवार यांच्याबरोबर निवडणूक आयोगासमोर उपस्थित होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड हे चौधरी यांना माध्यमांसमोर घेऊन आले.


मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले नव्हते, आरटीआयमधून उघड

जितेंद्र आव्हाड म्हणाले, कुवर प्रताप चौधरी यांचे प्रतिज्ञापत्र २७ ऑक्टोबर रोजी टाकण्यात आले आहे. चौधरी हे आमचे पक्षाचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. 1999 तेव्हापासून हे आमच्याबरोबर आहेत. ते शरद पवारांनाही आज भेटले आहेत. निवडणूक आयोगासमोर उभे राहिले आहेत.

‘…तर तुमची तिरडी बांधली जाईल’; हिंदुराष्ट्राची मागणी करताना बागेश्वर बाबांचं मोठं विधान

या खोट्या कागदपत्रांचे आधारे तुम्ही स्वतः पक्ष उभा करत आहे. त्यातून तुमची नीतिमत्ता किती खराब आहे. निवडणूक आयोगासमोर आणण्याचे प्रयत्न केले आहेत. आता येत्या शुक्रवारी पुढची सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई करण्याची आमची मागणी असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

आठ हजार प्रतिज्ञापत्र बनावट ?
याचिकाकर्त्यांनी आयोगासमोर दाखल केलेल्या सुमारे 20 हजार प्रतिज्ञापत्रांची आम्ही तपासणी केली. 8900 प्रतिज्ञापत्रे बनावट असल्याचे आम्ही सांगितले. मृत व्यक्तीचे प्रतिज्ञापत्रही याचिकाकर्त्यांनी दाखले केले होते. काही अल्पवयीन लोकांचे प्रतिज्ञापत्र दिले आहेत, असा युक्तिवाद ज्येष्ठ विधिज्ज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी केला होता. आता त्याच पद्धतीचा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे.

Tags

follow us