Jitendra Awhad : ‘त्या नासक्याला सांगा एक तरी’.. म्हस्केंची टीका आव्हाडांना झोंबली

Jitendra Awhad : ‘त्या नासक्याला सांगा एक तरी’.. म्हस्केंची टीका आव्हाडांना झोंबली

Jitendra Awhad : मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा पाडण्यात आली. त्यावरून आज मुंब्र्यात मोठा हायहोल्टेज ड्रामा झाला. शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. प्रचंड घोषणाबाजी झाली. ठाकरे गटाच्या लोकांना रोखण्यात आलं. इतकंच काय खुद्द उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही शाखेच्या ठिकाणी जाता आलं नाही. त्यामुळे त्यांना माघारी फिरावं लागलं. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच भडकले. त्यांनी म्हस्के यांच्यावर जोरदार पलटवार केला.

ज्या जितेंद्र आव्हाडांनी शिवसेनेच्या शाखा पाडल्या, त्या आव्हाडांबरोबर आज उद्धव ठाकरे आहेत अशी टीका म्हस्के यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेवर आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्या नासक्याला सांगा, एक उदाहरण दे.. असे प्रत्युत्तर आव्हाड यांनी दिले.

Uddhav Thackeray : ‘आता ठाणेकरच गद्दारांना धडा शिकवतील’ उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

नेमका प्रकार काय ?

काही दिवसांपू्र्वी मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पाडली होती. ही शाखा गुंडगिरी करत शिंदे गटाकडून बळकावण्यात आली असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या ठिकाणी नवी शाखा तयार करण्यात येणार असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. या जागेचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. काल याच ठिकाणी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते.

गद्दारांचं डिपॉझिट जप्क करून त्यांना घरी पाठवा : उद्धव ठाकरे

‘खरा बुलडोझर काय असतो ते दाखवायला आलो. आमच्या जागेवर सरकारने अतिक्रमण केलं आहे. शिवसेनेची शाखा येथेच भरणार. पाहू कोण आडवं येतं. मर्दाची औलाद असाल तर पोलीस बाजूला ठेवा अन् या भिडा आम्हाला. आमच्या शाखेपाशी ठेवलेला खोका उचला नाहीतर आम्ही फेकून देऊ. आता तुम्हीच निश्चय करा निवडणूक कोणतीही असो या निवडणुकीत गद्दारांचं डिपॉझिट जप्त करा आणि त्यांना घरी पाठवा. हे आता काही दिवसांचे पाहुणे. या नेभळटांना कुणी थारा देऊ नका. मी लढायला तयार आहे त्यासाठीच मी मैदानात उतरलो आहे.’

Uddhav Thackeray : ‘हिंमत असेल तर पोलीस बाजूला ठेऊन आम्हाला भिडा’ उद्धव ठाकरेंचं शिंदेंना आव्हान

ठाणेकरच गद्दारांना धडा शिकवतील 

ठाणेकर गद्दारांना धडा शिकवतील. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाण्यात येण्याची गरज नाही. यांचा माज उतरवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. पोलिसांनी मुंब्रयात भाडोत्री गुंडांना प्रवेश द्यायला नको होता. त्यांना संरक्षण द्यायला नको होतं. ज्यांचं अकलेचं दिवाळं निघालं आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील दिवाळी खराब होऊ नये म्हणून आम्ही संयम पाळला. पण, याचा अर्थ असा होत नाही की दरवेळी आमच्याकडून संयम आणि तुमच्याकडून यम असं होणार नाही. दरवेळी तुम्ही असं वागणार असाल तर आमच्या संयमातील ‘स’ गेल्याशिवाय राहणार नाही. मी परत एकदा सांगतो पोलिसांना बाजूला ठेवा. जे व्हायचं ते होऊनच जाऊ द्या, असा इशारा काल उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात दिला होता.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube